शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क फिरणाऱ्या 7 हजार नाशिककरांना दंडाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:31 IST

नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याबाबत उदासीनता दाखविली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मार्चचा पंधरवडा उलटल्यापासून आतापर्यंत शहरात पोलिसांनी तब्बल 7 हजार लोकांवर मास्क न लावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच 68 लोकांवर गुन्हे दाखल करत 433 व्यवसायिकांनाही दंडाचा दणका दिला आहे.

ठळक मुद्देशंभरांपेक्षा अधिक गुन्हे : 433 बेफिकीर व्यावसायिकांवरही कारवाई; 46 लाखांचा दंड वसूल

नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याबाबत उदासीनता दाखविली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मार्चचा पंधरवडा उलटल्यापासून आतापर्यंत शहरात पोलिसांनी तब्बल 7 हजार लोकांवर मास्क न लावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच 68 लोकांवर गुन्हे दाखल करत 433 व्यवसायिकांनाही दंडाचा दणका दिला आहे.पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1मध्ये पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर व मुंबईनाका या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तसेच परिमंडळ-2च्या उर्वरित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 17 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत पोलिसांनी मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. एकूण सुमारे 46 लाखांचा दंड आतापर्यंत वसूल केला गेला आहे.परिमंडळ-1मध्ये त्यानुसार विना मास्क फिरणाऱ्या ४ हजार २७ नागरिकांकडून १२ लाख ९२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असून 45 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या २०५ व्यावसायिकांवर कारवाई करत २ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वेळेचे बंधन न पाळणाऱ्या १८८ व्यावसायिकांना ३ लाख ९२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 121 लोकांवर रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत 74 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला आणि 72 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.परिमंडळ 2 मधील सर्व पोलीस ठाणे हृददीत विशेष मोहिम राबविण्यात आली होती। कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना त्याचे कुठलेही गांभीर्य न बाळगता प्रशासनाच्या आदेशामधील सुचनांचे विविधप्रकारे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या 2 हजार 843 बेफिकीर लोकांवर कारवाईचा बडगा उगारत एकूण 15 लाख 57 हजार 600 रूपये इतका दंड आकारण्यात आला. तसेच भादंवि कलम 188 प्रमाणे 24 अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळून आलेल्या23 थुंकीबहाद्दर निष्काळजीपणे वागणाऱ्यांवर कारवाई करत 24 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रात्रीच्या संचारबंदीचे हेतुपुरस्सर उल्लंघन करणाऱ्या 35 नागरीकांकडून एकूण 52 हजार 500 रूपये दंड वसूल केला गेला. आतापर्यंत 895 नागरीकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे.असा एकूण 25 लाख 50 हजार 300 रूपये दंड व भादंवि कलम 188 प्रमाणे एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.416 अस्थापनांना साडे 11लाखांचा दंडज्या आस्थापनाचालकांनी आदेश व सुचनांचे उल्लंघन केले अशा परिमंडळ-1 मध्ये 188 अस्थापनांच्या चालकांकडून 3 लाख 92 हजारांचा दंड वसूल केला गेला. तसेचपरिमंडळ 2मधील 228 आस्थापनावर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत 7 लाख 75 हजार 200 रूपये दंड ठोठावला. प्रशासनाने निर्गमीत केलेल्या विळेची मर्यादा न पाळणा-या 27 आस्थापनांवर कारवाई करून 1 लाख 41 हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन 8 अस्थापनांना कोरोना निर्मूलन होईपर्यंत टाळे ठोकण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या