शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

७० थकबाकीदारांच्या मिळकती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:04 IST

नाशिक : महापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आतापर्यंत ७० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात शहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश आहे. २१ दिवसांत संबंधित थकबाकीदारांनी रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची विक्री

नाशिक : महापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आतापर्यंत ७० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात शहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश आहे. २१ दिवसांत संबंधित थकबाकीदारांनी रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.महापालिकेने मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी थकविणाºया मिळकतधारकांविरुद्ध मोहीम आरंभली आहे. त्यात प्रामुख्याने, लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाºयांकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. आतापर्यंत सहाही विभागमिळून ७० मिळकतींवर जप्तीची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. त्याबाबतची माहिती देताना दोरकुळकर यांनी सांगितले, नाशिकरोड विभागातील सुजाता बिर्ला हॉस्पिटल (१० लाख ३८ हजार), ब्ल्यू पोर्ट प्रा. लिमिटेड (४ लाख), सिडको विभागातील दातार स्विचगिअर (३ लाख ६१ हजार), डॉ. कांतीलाल धाडीवाल (५ लाख २५ हजार), स्वरूप स्टील (८ लाख ४७ हजार), सागर मिल (४ लाख ६ हजार), सातपूर विभागातील शिवम टॉकीज (२ लाख ६६ हजार). महापालिकेने शहरातील ९० हजार मिळकतधारकांना सूचनापत्रे पाठविली आहेत. त्यानंतरही भरणा न केल्यास जप्तीची कारवाई करण्यात येते. जप्तीनंतर २१ दिवसांत रकमेचा भरणा न केल्यास लिलाव काढून मालमत्ता विक्री करण्यात येते. त्यापूर्वी, सदर मालमत्तेची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालय, मुद्रांक विभाग यांनाही कळविली जाते. त्यानंतर सदर मालमत्तेचे मूल्यांकन करून जाहीर लिलावाची नोटीस काढण्यात येते. त्यानंतर मालमत्तांची विक्री केली जाते. महापालिकेने आता केवळ जप्तीची कारवाई न करता थेट मालमत्तांची विक्रीच करण्याचा निर्णय घेतलेला आहे.- रोहिदास दोरकुळकर, उपआयुक्त