शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘टीडीआर’द्वारे ७० टक्के जागांचे संपादन

By admin | Updated: February 17, 2016 00:24 IST

हजार कोटींची बचत : नव्या धोरणामुळे मात्र आर्थिक बोजा

नाशिक : टीडीआर घेणे बंधनकारक नसले तरी त्याद्वारे आजवर महापालिकेची सुमारे हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याचा दावा महासभेत उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी केला. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ बग्गा यांनी आकडेवारीच सभागृहाला सादर केली. टीडीआरद्वारे महापालिकेने ७० टक्के जागांचे संपादन केले असून, नव्या धोरणातील जाचक अटींमुळे मात्र मनपावर आर्थिक बोजा पडणार असल्याची भीतीही बग्गा यांनी यावेळी व्यक्त केली. महापालिकेच्या महासभेत राज्य सरकारच्या टीडीआर धोरणाविरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सदर धोरण रद्द करणारा ठराव शासनाला पाठविण्याची विनंती केली. यावेळी या धोरणाचा महापालिकेच्या अर्थकारणावर काय परिणाम होणार आहे, याचाही ऊहापोह सदस्यांनी केला. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सदर कायद्यात आजच बदल का झाला, याचे स्पष्टीकरण देताना उद्देशिकाच समजून सांगितली. याचबरोबर मनपाने टीडीआरद्वारे केलेल्या व्यवहारांची आकडेवारी सादर केली. महापालिकेने वाटाघाटीद्वारे ९४ हजार चौ.मी. जागा संपादित केली आहे, तर भूसंपादनाच्या प्रस्तावाद्वारे १५ लाख चौ.मी. जागा संपादित केली आहे. सुमारे १६ लाख चौ.मी. जागा महापालिकेने रोखीने संपादित केली आहे. याउलट टीडीआरद्वारे महापालिकेने १९ लाख ८२ हजार चौ.मी. जागा संपादित केली आहे. सुमारे ७० टक्के जाता टीडीआरच्या माध्यमातून संपादित केल्याने महापालिकेवरील सुमारे एक हजार कोटी रुपयांचा बोजा कमी झाला असल्याचेही बग्गा यांनी सांगितले. कृष्णकांत भोगे आयुक्त असताना टीडीआर घेणाऱ्याचा महापालिकेत सत्कार केला जायचा. परंतु आता टीडीआर घ्यायला कुणी येऊच नये, अशी व्यवस्था करण्यात येत आहे, असा आरोप बग्गा आणि माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी केला. चालत्या-बोलत्या पालिकेला अर्धांगवायूची शक्यता असल्याची भीती व्यक्त करत बग्गा यांनी पूर्वलक्षी प्रभावाने असे निर्णय घेता येत नसल्याचे आणि ते न्यायालयात टिकूच शकणार नसल्याचेही स्पष्ट केले. शासन गोंधळलेले असल्याची टीकाही बग्गा यांनी केली.