शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

शहरात क्षयरोगाचे ७० रुग्ण

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

अत्याधुनिक यंत्रणा : १८ रुग्ण एमडीआर क्षयरुग्ण

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात क्षयरोगाचे निदान होण्याची अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत ७० रुग्ण क्षयाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे, तर १८ रुग्णांना एमडीआर क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आल्याची माहिती क्षयरोग विभागाचे डॉ. गणेश्वर यांनी दिली.सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी सुमारे ४० लाख रुपये किमतीची जीन एक्सपर्ट मशीन नाशिक महापालिकेला उपलब्ध करून दिली आहे. क्षयरोगाच्या निदानासाठी थुंकीचे नमुने मुंबई अथवा पुणे येथे पाठविल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास सुमारे २० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, या मशिनरीमुळे अवघ्या दोन तासांत क्षयरोगाचे निदान होण्याची सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध झाली आहे. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात केंद्र सरकारच्या निधीतून ही अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना अगदी मोफत सदर सुविधा उपलब्ध झाली आहे. १३ फेबु्रवारी २०१६ रोजी सदर मशिनरीचे लोकार्पण महापौरांच्या हस्ते झाल्यानंतर दोन महिन्यांत १३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असता ७० रुग्ण हे क्षयाने बाधित झाल्याचे निदर्शनास आले, तर त्यातील १८ रुग्णांना एमडीआर क्षयरोग झाल्याचेही निष्पन्न झाले. एमडीआर क्षयरोग हा नेहमीच्या औषधोपचारांना दाद न देणारा आजार असून, त्यासाठी वेगळ्या प्रकारचे औषधोपचार आहेत. या उपचारासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी जावा लागतो. (प्रतिनिधी)