शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात नाशकात सर्वाधिक ७० बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST

सह्याद्रीची पर्वतरांगा गोदावरी, दारणा, कादवासारख्या नद्यांचे प्रशस्त खोरे, उसाची बागायती शेती, गंगापूर, दारणा, वाघाडसारखी लहान-मोठी धरणे त्यांची कालवे राखीव ...

सह्याद्रीची पर्वतरांगा गोदावरी, दारणा, कादवासारख्या नद्यांचे प्रशस्त खोरे, उसाची बागायती शेती, गंगापूर, दारणा, वाघाडसारखी लहान-मोठी धरणे त्यांची कालवे राखीव वने यामुळे नाशिकला बिबट्यांचा अधिवासाकरिता पोषक असे भौगोलिक वातावरण आहे. यामुळे नाशिक पूर्व तालुक्यासह शहरालगतच्या खेड्यांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्याने आढळून येतो. वन विभागाकडून ठिकठिकाणी दररोज पिंजरे तैनात केले जातात अन‌् बिबट्यांना दर दिवसाआड जेरबंद केले जाते. मागील वर्षाच्या तुलनेत ३९ बिबटे मृत्युमुखी पडले होते. यावर्षी यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

लॉकडाऊनपासून आतापर्यंत नाशिक पूर्व-पश्चिम विभागातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड, येवला, चांदवड, दिंडोरी आदी भागातून सुमारे वीसपेक्षा अधिक बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक डझनभर बिबटे गोदावरीच्या खोऱ्यात नाशिक वनपरिक्षेत्रातील तालुक्याच्या पूर्व भागांमधील गावांमध्ये जेरबंद झाले आहे. लॉकडाऊन काळात नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात बिबट-मानव संघर्षदेखील उद‌्भवला होता. यावेळी तिघा चिमुकल्यांसह एका वृध्दाचा बळी गेला होता. त्यानंतर इगतपुरी तालुक्यात महिनाभरापूर्वी दोघा बालिकांचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

--इन्फो--

बिबट्यांच्या मृत्यूबाबत सगळ्यांचे ‘मौन’

बिबटे वाढल्याचे बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूबाबत फारशी चर्चा होत नाही. ज्याप्रमाणे नाशकात बिबटे मोठ्या संख्येने जेरबंद झालेत त्याचप्रमाणे बिबटे मृतावस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे; मात्र हे वास्तव सहजासहजी मनुष्यप्राणी स्वीकारणार नाही. नाशकात यावर्षी सुमारे ७० बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये बहुतांश बिबट्यांना माणसानेच त्यांच्या भरधाव वाहनांखाली चिरडून टाकले तर काही बिबट्यांना उघड्या विहिरींमध्ये कोसळून जलसमाधी घ्यावी लागली, यालाही माणसांचेच दुर्लक्ष कारणीभूत ठरतेय.

---इन्फो--

नाशिकपाठोपाठ पुण्याचा क्रमांक

नाशिक वनवृत्तात अहमदनगरचाही समावेश होतो. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ७० बिबटे यावर्षी नोव्हेंबरपर्यंत मृत्युमुखी पडल्याचाी नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. त्यापाठोपाठ पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत तर कोल्हापूरमध्ये २६ आणि धुळ्यात १० बिबटे गतप्राण झाले. राज्यातील या शहरांमध्ये बिबटे मृत्यूची संख्या दोन आकडी आहेत, उर्वरित जिल्ह्यांत ती एक आकडी आहे.

----

फोटो आर वर १०फॉरेस्ट नावाने.