शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

७० कोटींचे कर्ज पुनर्गठन

By admin | Updated: August 9, 2015 22:16 IST

नरेंद्र दराडे : शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी हप्ते ठरवून देणार; ३० सप्टेंबरपर्यंत कार्यवाही

येवला : कर्जाचे पुनर्गठन होणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी कर्जाचे हप्ते ठरवून देण्यात येणार आहेत. या प्रक्रियेतील सर्व अडचणी दूर झाल्याने जिल्हा बँकेतून सुमारे ७० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण होणार असून, नाबार्ड व राज्य सहकारी बँकेनेदेखील यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली.गेल्या वर्षी अल्प पाऊस झाल्याने काही जिल्हे दुष्काळाच्या छायेखाली होती. अल्प पावसामुळे खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. या दोन्ही हंगामात बाधित शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल झालेला नाही. परिणामी हंगामासाठी घेतलेल्या पीककर्जाची वेळेत परतफेड करणे शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही. तसेच डिसेंबरमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये राज्याच्या काही भागांत गारपिटीनेही थैमान घातले होते. या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन आणि वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे.जिल्हा बँकानी पीककर्जाचे रुपांतर केल्यानंतर रु पांतरित कर्जाच्या ६० टक्के रक्कम नाबार्ड, १५ टक्के हिस्सा राज्य शासन, दहा टक्के हिस्सा राज्य सहकारी बँक, तर उर्वरित १५ टक्के रक्कम बँकेने स्वखर्चातून उपलब्ध करावी, अशी तरतूद आहे. ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्हांपैकी नाशिकसह अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारामधील जिल्हा बँकांनी कर्जाचे रुपांतर केले असून, त्या रकमेचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. मात्र कर्जाचे रूपांतर करण्यासाठी नाबार्ड जो हिस्सा देणार होते, त्यासाठी शासनाने हमीची मागणी केली जात होती. आता शासनाने हमी घेतल्याने अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या ६६ कोटी १६ लाख रुपयांपैकी ६० टक्के म्हणजेच ३९ कोटी ६९ लाख रुपये हिस्सा मिळणार आहे. तसेच राज्य सरकारच्या १५ टक्के हिस्स्याची रक्कम नऊ कोटी ९२ लाख रुपयेही राज्य सरकारने मंजूर केले आहे. पहिल्या वर्षाचे संपूर्ण तर त्यापुढील चार वर्षांचे सहा टक्के व्याजही राज्य सरकार भागवणार आहे.दुष्काळ व गारपिटीत बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या हेतूने राज्य सरकार पहिल्या वर्षीचे संपूर्ण व्याज स्वत: भागवणार आहे. तसेच त्यापुढील चार वर्षांचे सहा टक्के व्याजही सरकारकडून संबंधित बॅँकांना अदा केले जाणार आहे. पुनर्गठित कर्जावर बॅँकांकडून सुमारे साडेअकरा ते बारा टक्के व्याज आकारले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांवर सहा टक्के व्याजाचा भार पडणार आहे. पीककर्जावर साधारणपणे सहा ते सात टक्के इतके व्याज आकारले जाते.शेतकरी हितासाठी कर्जाचे पुनर्गठन करण्यास मान्यता दिली जावी व त्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. सरकारने अडचणीतील सहा बँकांसोबत नाशिक जिल्हा बँकेलाही हा निधी देण्यास मान्यता दिली आहे. नाबार्डच्या निधीला हमी व स्वहिस्सा मंजूर केल्याने आता उर्वरित पुनर्गठन ३० सप्टेंबरअखेर पूर्ण केले जाणार असल्याचे नरेंद्र दराडे सांगितले. (वार्ताहर)