शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

७० सिल्व्हर ओकच्या झाडांवर कुर्‍हाड वृक्षप्रेमींचा आक्षेप : न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप

By admin | Updated: May 27, 2014 01:42 IST

नाशिक : उच्च न्यायालयाने शहरातील झाडे तोडण्यास मनाई केली असताना एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान असलेली ७० झाडे रस्ता रुंदीकरणामुळे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची तक्रार याचिकाकर्ता ऋषिकेश नाझरे यांनी केली असून, संबंधित ठेकेदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नाशिक : उच्च न्यायालयाने शहरातील झाडे तोडण्यास मनाई केली असताना एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान असलेली ७० झाडे रस्ता रुंदीकरणामुळे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची तक्रार याचिकाकर्ता ऋषिकेश नाझरे यांनी केली असून, संबंधित ठेकेदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.महामार्ग रुंदीकरणाच्या दरम्यान, बाधित होणार्‍या झाडे तोडणार्‍या महामार्ग प्राधिकरण आणि त्यांना संमती देणारी नाशिक महापालिका यांच्या विरुद्ध नाशिक नागरी कृती समितीच्या अश्विनी भट, कर्नल आनंद देशपांडे आणि ऋषिकेश नाझरे यांनी २००६ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्यायालयात सुरू असून, अलीकडेच न्यायालयाने शहरातील कोणतेही झाड महापालिकेच्या परवानगीशिवाय तोडण्यास मनाई केली आहे. असे असताना त्र्यंबकरोडवरील ए.बी.बी. सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान, रस्ता रुंदीकरण करताना सिल्व्हर ओकची ७० झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे याचिकाकर्ता ऋषिकेश नाझरे यांनी त्यास आक्षेप घेतला असून, यासंदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहेत. त्यात न्यायालयाच्या आदेशाच संदर्भ दिला असून, यासंदर्भात संबंधित ठेकेदारावर दोन दिवसांत फौजदारी कारवाई करावी आणि तसे लेखी कळवावे अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.दरम्यान, पालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे. पालिकेकडे वृक्षप्राधिकरण समितीत तज्ज्ञ सदस्य नाहीत. त्यामुळे वृक्ष कायद्याचे पालन होत नाहीच; परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाचेदेखील भान नाही. त्यामुळे आधी वृक्षप्राधिकरण समितीचे गठन व्हावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी केली आहे.