शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन एक्स्प्रेसचे ७ टँकर्स शनिवारी नाशकात होणार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:14 IST

नाशिक : राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १८ एप्रिलला ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (दि.२४) ...

नाशिक : राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १८ एप्रिलला ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (दि.२४) नाशिकला दाखल होणार आहे. या एक्स्प्रेसमधील ७ टँकर्स हे नाशिकला उतरवले जाणार आहेत.

गुरुवारी रात्री विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी सकाळी १० वाजता नाशिकरोड स्थानकात पोहोचणार आहे. या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्स नाशिकमध्ये उतरवले जाणार असून, त्याबाबतचे नियोजन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात सर्व महानगरांमध्ये करोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. रेल्वेद्वारे महाराष्ट्रासाठी रोल ऑन रोल म्हणजे रोरो पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. नवी मुंबईच्या कळंबोली स्थानकातून १८ एप्रिलला रात्री ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेली होती. आता या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्समध्ये ऑक्सिजन भरण्यात आला असून, विशाखापट्टणमच्या स्टील प्लांटमध्ये ऑक्सिजनचे हे टँकर्स भरण्यात आले आहेत. ही एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून रवाना झाली आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजेदरम्यान ही एक्स्प्रेस नागपुरात दाखल झाली. नाशिकला शनिवारी (दि. २४) सकाळी १० वाजता ही एक्स्प्रेस पोहोचणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन वितरणासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य शासनाच्या निर्देशानुसार ऑक्सिजन कमतरता असलेल्या ठिकाणी हे टँकर्स पोहोचवले जाणार आहेत.

इन्फो

नाशिकमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असून, अनेक खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच उपलब्ध होत नसल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेणेच अनेक रुग्णालयांनी थांबवले आहे. काही रुग्णालयातून तर रुग्ण इतरत्र हलविण्यात आले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी होत असल्यामुळे तुटवडा भरून काढण्यात प्रशासनदेखील हतबल ठरू लागले आहे. अशा परिस्थितीत येणारे ऑक्सिजन टँकर हे तुटवड्याची पूर्ण पूर्तता करू शकणार नसले तरी काही प्रमाणात तरी दिलासादायक ठरू शकणार आहेत.