शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये चढताना ७ विद्यार्थी पडले : चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 15:45 IST

पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ७ विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१५) सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण करून काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलिस ...

पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ७ विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१५) सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण करून काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलिस पथक दाखल झाल्यानंतर समझोता होऊन बससेवा पुर्ववत सुरू झाली.बसचालकाने बस थांब्यावर थांबविली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान या प्रकारानंतर आडगाव परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आडगावमधुन नाशिकला नोकरी-शिक्षण कामधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा करणारे प्रवासी आहेत. पुर्वी या मार्गावर मुबलक बस होत्या, मात्र आर्थिक तोट्याचे कारण पुढे करुन नाशिक आगाराने बसफेºया कमी करण्यात आल्या आहेत. त्यातच मात्र बसचालक बस थांब्यावर बस न थांबविता पुढे नेऊन थांबवित आहेत. शुक्र वार (दि.१५) सकाळच्या सुमाराला काही महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी बस थांब्यावर थांबलेले असतांना ओझरकडून नाशिकला जाणारी बस आली मात्र ती बस थांब्यावर न थांबल्याने काही विद्यार्थी बसमागे धावत धावत्या बसमध्ये चढले तरी देखील चालकाने बस न थांबविल्याने अमोल पुरकर, बाळा जाधव या दोघा विद्यार्थ्यांसह ७ विद्यार्थी तोल जाऊन बसमधून खाली पडले. यात विद्यार्थ्यांच्या हाताला, पायाला व कमरेला किरकोळ मार लागला आहे.सकाळच्या सुमाराला आडगाव बसथांबा परिसरात ग्रामस्थांची वर्दळ असल्याने बसमधून विद्यार्थी पडल्याचे निदर्शनास येताच काही ग्रामस्थांनी त्या विद्यार्थ्यांना उचलले.त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बसचालकाला मारहाण करून आडगावातून जाणाºया सय्यद पिंप्री, सायखेडा, ओझर, विंचूर गवळी, मोहाडी या बस थांबवून अर्धा ते पाऊणतास बससेवा बंद पाडली.सदर घटनेनंतर एसटीचे अधिकारी व आडगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवासी, नागरिक यांच्याशी चर्चा करत आश्वासन दिल्याने वाद मिटला व बससेवा पुर्ववत सुरू झाली. आडगावातून नाशिकला जाणाºया बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी करूनही त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.