शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

चास येथे बिबट्यांनी केल्या ७ शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:40 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास शिवारात वस्तीसमोर दिवसाढवळ्या तीन बिबट्यांनी ७ शेळ्या फस्त केल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देतीन बिबट्यांनी अचानक शेळ्यांवर हल्ला चढवला.वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी अनेक दिवसापासून वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास शिवारात वस्तीसमोर दिवसाढवळ्या तीन बिबट्यांनी ७ शेळ्या फस्त केल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, व अकोले तालुक्यातील डोंगरगाव आदी भागात डोंगराळ भाग असल्याने नेहमीच या दिवसात बिबट्यांच्या वावर असतो. चास - नळवाडी रस्त्यावर बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव खैरनार यांच्या वस्तीशेजारी तुकाराम एकनाथ ढाकणे हे गट नंबर २२३ मध्ये राहतात. घराच्या शेजारीच त्यांची शेतजमीन आहे. ढाकणे यांच्या घरासमोर १० ते ११ शेळ्या दावणीला बांधलेल्या होत्या. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तीन बिबट्यांनी अचानक शेळ्यांवर हल्ला चढवला. ढाकणे कुटुंबीयासमोर हल्ला झाल्याने त्यांची अक्षरश: भांबेरी उडाली होती. त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्यांनी शेळ्यांची चिरफाड करत ७ शेळ्या फस्त केल्या. ढाकणे यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा होऊ लागले, त्यानंतर सदरची घटना वनविभागास कळविण्यात आली. सुमारे पन्नास ते साठ हजारांच्या आसपास ढाकणे यांचे नुकसान झाल्याचे कळते. दरम्यान दुपारी दोन वाजता नांदूरशिंगोटे वनपाल पी.ए.सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली़सिन्नर तालुक्यात अनेक दिवसापासून वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भोजापूर परिसरात दोन महिन्यापूर्वी दुचाकीस्वारावर एका बिबट्याने हल्ला केला होता. आजमितीला दोन ते तीन बिबटे दिवसभर वावरताना दिसत असल्याने वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.