शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

६५ रुपयांचे घासलेट, साडेतीनशेचे सिलिंडर विका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:21 IST

सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत गोरगरिबांना शिधापत्रिकेवर देण्यात येणारे धान्य, घासलेटच्या अनुदानात हळूहळू कपात करून शासनाने आता खुल्या बाजारभावाप्रमाणे जीवनावश्यक वस्तू विक्रीचा उद्योग सुरू केला असून, त्यातूनच सोमवारी नाशिक तालुक्यातील रेशन दुकानदारांची पुरवठा खात्याने बैठक घेऊन त्यात रेशन दुकानदारांनी ६५ रुपये प्रति लिटर या दराने फ्री सेलचे घासलेट तसेच पाच किलो वजनाचे सिलिंडर साडेतीनशे रुपयांना विक्रीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत गोरगरिबांना शिधापत्रिकेवर देण्यात येणारे धान्य, घासलेटच्या अनुदानात हळूहळू कपात करून शासनाने आता खुल्या बाजारभावाप्रमाणे जीवनावश्यक वस्तू विक्रीचा उद्योग सुरू केला असून, त्यातूनच सोमवारी नाशिक तालुक्यातील रेशन दुकानदारांची पुरवठा खात्याने बैठक घेऊन त्यात रेशन दुकानदारांनी ६५ रुपये प्रति लिटर या दराने फ्री सेलचे घासलेट तसेच पाच किलो वजनाचे सिलिंडर साडेतीनशे रुपयांना विक्रीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.  राज्य शासनाने घासलेटचा वापर कमी करण्यासाठी हवे त्याला गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यालाच आधार म्हणून आता ज्यांच्याकडे गॅस नाही, परंतु त्यांना शिधापत्रिकेवर घासलेट दरमहा दिले जाते अशा ग्राहकांचेही घासलेट हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली आहे. खुल्या बाजारात घासलेटचे दर ६२ रुपये असून, तेच घासलेट रेशन दुकानदारांमार्फत विक्री करण्याचे ठरविले आहे.  ज्या ग्राहकांना घासलेटची गरज आहे त्यांनी ते खरेदी करावे तर दुसरीकडे ज्यांना लहान गॅस सिलिंडर हवे असेल तेदेखील विक्रीसाठी खुले केले आहे. पाच किलो वजनाचे गॅस सिलिंडर रेशन दुकानदारांना उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांनी ते साडेतीनशे रुपयांना विक्री करायचे आहे, त्यात त्यांना प्रति सिलिंडरमागे ४० रुपये कमिशन दिले आहे. सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी कासार यांनी रेशन दुकानदारांना त्यासाठी आग्रह धरला असता दुकानदारांनी त्यास कडाडून विरोध केला. रेशनमधूनच जर शिधापत्रिकाधारकांना पुरेसे घासलेट उपलब्ध करून दिले तर फ्री सेलच्या वाढीव दराने घासलेट विक्रीची गरज भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले, तसेच खुल्या बाजारात डिझेल ६० रुपये प्रतिलिटर मिळत असताना ६५ रुपयांचे घासलेट कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला. तर गॅसधारकांना नोंदणी केल्यानंतर सहा तासांत घरपोच सिलिंडर कंपनीकडून उपलब्ध करून दिलेले असताना साडेतीनशे रुपये खर्च करून कोणता ग्राहक लहान सिलिंडर खरेदी करेल, अशी विचारणा केली.अनामत रक्कम आगावू घेण्याची अटशासनाने लहान सिलिंडर विक्री करण्यासाठी रेशन दुकानदारांना प्राधान्य दिले असले तरी, त्यासाठी त्यांनीच जागेची सोय करावी, तसेच ज्या ग्राहकाला सिलिंडर हवे असेल त्याच्याकडून साडेबाराशे रुपये सिलिंडरची अनामत रक्कम आगावू घेण्याची अट टाकली आहे. हे सर्व पाहता रेशन दुकानदारांनी त्यास विरोध करून गावोगावी असलेल्या गॅस एजन्सीच दुकानदारांना चालविण्यास द्या, अशी मागणी केली.