शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

६४ वर्षांची रामलीला परंपरा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:57 IST

नाशिक: गांधीनगरच्या मैदानावर दरवर्षी होणारी रामलिला आणि रावण दहनाचा कार्यक्रम यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे होणार नसल्याने ६४ वर्षात प्रथमच रामलिलेची परंपरा खंडीत होणार आहे. येथील उत्सवाला दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी श्रीरामलिला समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देगांधीनगर उत्सव : श्रीरामलिला समितीकडून दक्षता

नाशिक: गांधीनगरच्या मैदानावर दरवर्षी होणारी रामलिला आणि रावण दहनाचा कार्यक्रम यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे होणार नसल्याने ६४ वर्षात प्रथमच रामलिलेची परंपरा खंडीत होणार आहे. येथील उत्सवाला दरवर्षी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी श्रीरामलिला समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाससाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार यंदा नवरात्रोत्सव आणि दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. गांधीनगर येथील रामलिाला उत्सव आणि रावण दहनाचा कार्यक्रम साजरा करण्याची अत्यंत जूनी परंपरा आहे. गेल्या ६४ वर्षांपासून अखंडपणे ही सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळ सुरू आहे. नाशिककर आणि रामलिला उत्सव यांचे एक नाते जुळले असून येथील सोहळा नाशिकचा लौकीक मानला जातो. ६५ व्या वर्षात पदार्पण करतांना यंदाचा उत्सवाबाबत कलावंत आणि आयोजकांमध्ये चांगलाच उत्साह होता.देशावर उद्भवलेल्या संकटाच्या काळात श्रीरामलिला समितीने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेत यंदा रामलिला उत्सव आणि रावण दहन न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याची माहिती उत्सव समितीचे महासचिव कपीलदेव शर्मा यांनी दिली. रामलिलेत काम करणाºया कलावंताना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी देखील सामाजिक जाणिवेतून रामलिला उत्सवाला अर्धविराम देण्याच्या निर्णयाला संमती दिली आहे.-- इन्फो--दुर्गा पूजा उत्सवही होणार रद्दकारोनाच्या प्रादुर्भावामुळे यंंदा रामलिला आणि रावण दहनाबरोबरच गांधीनगर मैदानावर होणारा दुर्गापूजा महोत्सव देखील होणार नसल्याचे समजते. गर्दीमुळे कोरोनाचा प्रकोप होऊ नये यासाठी गांधीनगर प्रेस प्रबंधकांनी हे दोन्ही कार्यक्रम स्थगित केले आहेत.--कोट--रामलिला पाहाण्यासाठी दररोज होणारी हजारो नागरिकांची गर्दी आणि रावण दहनाच्या दिवशी ओसंडून वाहणारा जनमुदाय लक्षात घेता कोरोनामुळे यंदा उत्सव रद्द करण्यात आला आहे. देशावरील संकटाचा विचार करून समिती आणि कलावंतांनी सहमतीने हा निर्णय घेतला. गांधीनगर प्रेसच्या प्रबंधकांनी देखील यंदाच्या उत्सव घेऊ नये असे सुचिवले आहे.- कपीलदेव शर्मा, महासचिव, श्रीरामलिला समिती

 

टॅग्स :gandhinagar-pcगांधीनगरramayanरामायण