शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात ६३८ ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 19:10 IST

दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवत नागरिकांनीही घरीच राहणे पसंत करून वीकेंडच्या कडकडीत बंदला स्वयंस्फूर्तीने साथ दिली आहे.

ठळक मुद्देवीकेंड कडक निर्बंधाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिंडोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवत नागरिकांनीही घरीच राहणे पसंत करून वीकेंडच्या कडकडीत बंदला स्वयंस्फूर्तीने साथ दिली आहे.शहरात दवाखाने व मेडिकल सुरू होते. इतर सर्व व्यवसाय बंद असल्याने नागरिकांची वर्दळही थांबली होती. पोलिसांकडून पालखेड चौफुलीवर चेकपोस्ट करत येणाऱ्या-जाणाऱ्यांची विचारपूस केली जात असून सध्या शेतमालाची किरकोळ वाहतूक सुरू होती. नागरिकांनीही या कडकडीत बंदला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले.मोहाडी ग्रामस्थांनी बैठक घेत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला असून, गाव कोविडमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.दरम्यान, दिंडोरी तालुक्यात ६३८ रुग्ण हॉटस्पॉट बनलेल्या मातेरेवाडीत परिस्थिती नियंत्रणात आहे, तर वणी व खेडगावमध्ये रुग्ण वाढले आहेत.तालुक्यात ६३८ रुग्ण ॲक्टिव्ह असून हॉटस्पॉट बनलेल्या मातेरेवाडी येथील रुग्ण संख्या घटली आहे. आता २६ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर सर्वाधिक रुग्ण वणीत ७८, दिंडोरीत ६९, खेडगाव ५५, उमराळे बु ३०, मोहाडी २६, चिंचखेड २५, सोंनजांब २३, लाखमापूर २३ असे विविध गावांत रुग्ण असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावित गावात व परिसरात सर्वेक्षण तपासण्या सुरू आहेत.नागरिकांनी काळजी घेत नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत