शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दीत ६३७१ अपंग सर्वेक्षण पूर्ण : १९३९ जणांकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:19 IST

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, पथकाने ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्यानंतर ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अपंग व्यक्तींची संख्या असली तरी १९३९ व्यक्तींकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले आहे. महापालिकेने आता येत्या १० सप्टेंबरपासून या अपंग व्यक्तींसाठी विभागनिहाय वैद्यकीय तपासणी शिबिरांचे नियोजन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, पथकाने ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्यानंतर ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अपंग व्यक्तींची संख्या असली तरी १९३९ व्यक्तींकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले आहे. महापालिकेने आता येत्या १० सप्टेंबरपासून या अपंग व्यक्तींसाठी विभागनिहाय वैद्यकीय तपासणी शिबिरांचे नियोजन केले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली आहे.महापालिकेत अपंग पुनर्वसन कायद्यानुसार अपंग व्यक्तींना सोयीसुविधा पुरविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा आराखडाही तयार केला आहे तर सुमारे १४ कोटी रुपये चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी शहरातील अपंगांचा सर्व्हे करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार, वैद्यकीय विभागाने आशा कर्मचारी तसेच विविध संस्थांच्या सुमारे ७५० कर्मचाºयांच्या माध्यमातून दि. ८ ते २४ आॅगस्ट या कालावधीत घरोघरी जाऊन सर्व्हे केला. ज्यांच्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहे, अशा लोकांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्यात आले. पथकाने शहरातील ४ लाख ८६ हजार ९९१ घरांना भेटी दिल्या. त्यात ६३७१ व्यक्ती विविध प्रकारचे अपंग आढळून आले. प्रामुख्याने, सर्वेक्षणात ९०९ व्यक्ती या मानसिक संतुलन बिघडलेल्या निदर्शनास आल्या तर ७५६ व्यक्ती अंध आढळून आल्या. ८१४ व्यक्ती या मूकबधिर असून ३८९२ व्यक्तींना विविध प्रकारचे व्यंग आढळून आले. ६३७१ व्यक्तींपैकी १९३९ व्यक्तींकडेच जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मिळालेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले. सर्वाधिक १२७३ अपंग हे सिडको विभागात आढळून आले असून, सर्वात कमी ३०३ अपंग हे पश्चिम विभागात आढळून आले आहेत.