शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जमिनीचा ६३ लाखांना फेरलिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:00 IST

मालेगाव : येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे ७७७ शेतकऱ्यांचे २ कोटी ९० लाख ५४ हजार २६४ रुपये थकीत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली होती. या जप्त केलेल्या मालमत्तेचा बुधवारी फेरलिलाव घेण्यात आला. पावणेचार एकर क्षेत्र मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ४८ लाखांना तर ३० आर क्षेत्र श्रावण सूर्यवंशी यांनी १५ लाखांना लिलावात बोली लावून घेतले आहे. या लिलावातून मिळणारे ६३ लाख रुपये कांदा विक्रेत्या शेतकºयांना अदा केले जाणार आहेत.

ठळक मुद्देलिलावातून मिळणारे ६३ लाख रुपये कांदा विक्रेत्या शेतकºयांना अदा केले जाणार

मालेगाव : येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे ७७७ शेतकऱ्यांचे २ कोटी ९० लाख ५४ हजार २६४ रुपये थकीत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली होती. या जप्त केलेल्या मालमत्तेचा बुधवारी फेरलिलाव घेण्यात आला. पावणेचार एकर क्षेत्र मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ४८ लाखांना तर ३० आर क्षेत्र श्रावण सूर्यवंशी यांनी १५ लाखांना लिलावात बोली लावून घेतले आहे. या लिलावातून मिळणारे ६३ लाख रुपये कांदा विक्रेत्या शेतकºयांना अदा केले जाणार आहेत.मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील जय भोलेनाथ टेंडर्सचे व्यापारी सूर्यवंशी यांनी तालुक्यातील शेतकºयांकडून कांदा खरेदी केला होता. खरेदी केलेल्या कांद्यापोटी शेतकºयांना धनादेश दिले होते; मात्र धनादेश वटले नसल्यामुळे शेतकºयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. १३ आॅगस्टला लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या लिलावात केवळ कारचा लिलाव झाला होता. त्यामुळे जमिनीचा तहसीलदार ज्योती देवरे यांच्या दालनात फेरलिलाव करण्यात आला. गट क्रमांक ९१/१ व ९१/२ यांचे दुय्यम निबंधकांनी मूल्यांकन १८ लाख रुपये काढले होते. या लिलावात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे व पदाधिकाºयांनी सहभाग घेत ४८ लाखाला ही जमीन घेतली, तर सूर्यवंशी यांचे राहते घर वगळून उर्वरित ३० आर क्षेत्राचे मूल्यांकन ७९ हजार काढण्यात आले होते. श्रावण विक्रम सूर्यवंशी यांनी १५ लाख रुपयांना ३० आर क्षेत्र घेतले आहे. या लिलावातून ६३ लाख रुपये मिळणार आहेत. पंधरा दिवसांत पैसे जमा करावे लागणार आहेत. ही जमा झालेली रक्कम फसवणूक झालेल्या शेतकºयांना अदा केली जाणार आहे. यावेळी शांताराम लाठर, काशीनाथ पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.तहसीलदार देवरे यांच्या दालनात शिवाजी सूर्यवंशी यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू असताना दालनाबाहेर सूर्यवंशी यांच्या पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांना अश्रू अनावर झाले होते. जमिनीचा लिलाव होत असल्यामुळे त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता.