शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

१७ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: November 11, 2016 23:16 IST

१७ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात

नांदगाव : नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार आजमावणार नशीबनांदगाव : नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी व प्रभागातून ११ जणांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी पाच व आठ प्रभागांमधील १७ जागांसाठी ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीचा दिवस अनपेक्षित माघारींनी गाजला. भाजपा व शिवसेनेच्या एकेक उमेदवाराने माघार घेतली. सकाळी ११ वाजेपासून नगरपरिषद परिसरात मोठी गर्दी जमली होती. कोण माघार घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेच्या समर्थकांव्यतिरिक्त इतर पक्षांचे कार्यकर्ते तुरळक होते. परंतु लढतींचे चित्र स्पष्ट झाले. प्रत्येक पक्षाला विशेषत: भाजपाला बंडखोरीचा फटका बसणार असल्याचे अधोरेखित झाले.माघारीच्या तडजोडी पडद्याआड झाल्या असून, त्याची वाच्यता जाहीर करण्यात येत नसली तरी त्यामागील मतांची गणिते सुरू आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी, भाजप व शिवसेना अशा तिरंगी लढती ठिकठिकाणी होत आहेत. नगराध्यक्षपदाची लढत पंचरंगी होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात राहिलेले उमेदवार राजेश कवडे (शिवसेना), अरुण पाटील(राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), संजय सानप (भाजप),शिवाजी पाटील (अपक्ष), कल्पना वाघ (अपक्ष) असे आहेत.प्रभाग क्र. १ मध्ये संगीता जगताप (१ अ) (कॉँग्रेस), इंदिरा बनकर (१ अ) (भाजपा), कांचन काकळीज (१ अ) (शिवसेना), वाल्मीक टिळेकर (१ ब) (राष्ट्रवादी ), सुरेश शेळके (१ ब), (भाजपा), नरेंद्र पाटील (अपक्ष), नितीन जोशी (अपक्ष). प्रभाग क्र. २ मध्ये सुरेश गायकवाड (२अ) (राष्ट्रवादी), लीलावती महाजन (२अ),(भाजप), अभिषेक सोनवणे(२ अ ) (शिवसेना), चिंतामण आहेर (अपक्ष), कमलेश पेहरे (अपक्ष) नंदा कासलीवाल (२ब) (काँग्रेस), राखी मोकळ(२ब) (शिवसेना), संगीता जाधव (अपक्ष), शाहिस्ता माजीद सैयद (अपक्ष)प्रभाग क्र. ३ मध्ये करुणा जाधव (३ अ) (काँग्रेस), निर्मला केदारे (३ अ) (भाजपा), कामिनी साळवे (३ अ) (शिवसेना), साक्षी आहिरे (राष्ट्रवादी), सचिन देवकाते (३ ब) (राष्ट्रवादी), राजेंद्र गांगुर्डे (३ ब) (भाजपा), कारभारी शिंदे (३ब) (शिवसेना), देवीदास भोपळे (भाकप), संतोष वाघ (अपक्ष) प्रभाग क्र. ४ मध्ये प्रगती निकम (४ अ) (भाजप), चांदनी खरोटे (४ अ) (शिवसेना), सुमीत गुप्ता (४ ब) (काँग्रेस), प्रशांत संत (४ ब) (भाजपा), शोभा कासलीवाल (४ ब) (शिवसेना), शिवाजी पाटील (अपक्ष), राकेश बागोरे (अपक्ष).प्रभाग क्र. ५ मध्ये विशाल खैरनार (५अ)(काँग्रेस), संजीव वाघ (५अ) (भाजप), किरण देवरे (५ अ) (शिवसेना) अक्का सोनवणे (५ ब) (काँग्रेस), वंदना कवडे (५ ब) (शिवसेना). प्रभाग क्र. ६ मध्ये शारदा चव्हाण (६ अ) (काँग्रेस), सुनीता सोनवणे (६ अ) (भाजप), सविता शेवरे (शिवसेना), सुरज पाटील (६ ब) (काँग्रेस), राहुल आहिरे (६ब) (भाजप), मनीषा काकळीज (६ ब) (शिवसेना). प्रभाग क्र. ७ मध्ये वनिता पाटील (७ अ) (राष्ट्रवादी), संगीता उगले (७ अ) (भाजपा), सरस्वती गिते (७ अ) (शिवसेना). शेख बालेमिया अब्दुल (७ ब) (राष्ट्रवादी), उमेश उगले (७ ब) (भाजप), शेख फैज गफार शेख (७ब) (शिवसेना), संतोष भोसले (अपक्ष)प्रभाग क्र. ८ मध्ये काका सोळसे(८अ)(राष्ट्रवादी), प्रकाश थोरात (८अ)(भाजप), नितीन जाधव(८अ) (शिवसेना), नीलोफर बेग(अपक्ष) सीमा राजुळे (८ब)(राष्ट्रवादी), दगूबाई सानप (८ब) (भाजप), सुनंदा पवार(८ब) (शिवसेना). योगीता गुप्ता (८क) (राष्ट्रवादी), शशीकला बागोरे (८क) (भाजप), परिघाबाई शिंदे(८क) (शिवसेना), आशाबाई पाटील (अपक्ष). प्रभाग क्र. १ ब मध्ये शिवसेना उमेदवार रविंद्र पैठणकर यांनी अपक्ष उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी माघार घेतली. पाटील यांनी भाजपचे तिकीट मागितले होते पण त्यांना ते मिळाले नव्हते. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार संजय पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. भाजपकडून नगराध्यक्षपदाचे दावेदार हेमांगी देशमुख यांचे तिकीट शेवटच्या क्षणी कापले गेल्याने नाराज झालेल्या विलासराव देशमुख यांच्या पत्नी हेमांगी यांनी प्रभाग क्र. २ ब मधून माघार घेतली. त्यांना भाजपने प्रभागासाठी एबी फॉर्म दिला होता. नगराध्यक्ष पदासाठीचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना मनविण्याचे इतरांचे प्रयत्न अयशस्वी झाले. यावर आज शिक्कामोर्तब झाले. ते नगराध्यक्षपद व प्रभाग क्र. ४ या दोन ठिकाणी आपले नशीब अजमावत आहेत. (वार्ताहर)