शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नोटिसीला ६००० करदात्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

नाशिक: शेतकऱ्यांना निर्माण होणारी आर्थिक अडचण दूर व्हावी, त्यांना दिलासा मिळावा यासाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजना राबविली जाते. ...

नाशिक: शेतकऱ्यांना निर्माण होणारी आर्थिक अडचण दूर व्हावी, त्यांना दिलासा मिळावा यासाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजना राबविली जाते. शेतकऱ्यांना सन्मान देणारी ही पेन्शन योजना असली तरी कोणत्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल याविषयीचे निकष तयार करण्यात आलेले आहेत. परंतु असे निकष टाळून अनेक शेतकऱ्यांनी या याेजनेत नाव नोंदविल्याने अशा शेतकऱ्यांकडून आता वसुली सुरू करण्यात आली आ हे. यामध्ये करदाते शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

जे शेतकरी आयकर भरत असतील किंवा शासकीय सेवेत असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. जो शेतकरी शेती करतो, परंतु शेत त्याच्या नावावर नाही तर त्याच्या वडिलांच्या, आजोबांच्या नावावर असेल तर अशाही शेतकऱ्याला लाभ दिला जात नाही. दुसऱ्याची शेती कसत असेल तर असा शेतकरीसुद्धा योजनेसाठी पात्र नाही. डॉक्टर्स, इंजिनिअर, सीए, वकील आदी व्यावसायिक असलेल्या शेतकऱ्यांनादेखील योजनेचा लाभ दिला जात नाही. असे सर्व निकष असले तरी अनेकांनी योजनेत नावे नोंदविली. यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे आयकर भरणारे आहेत.

अशा शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी त्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यातील काही शेतकऱ्यांनी योजनेचे घेतलेेले पैसे परत केले असले तरी अद्यापही सुमारे ६,५५० शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे पुन्हा भरलेले नाहीत.

--इन्फो--

पीएम किसान पेन्शन योजनेचा आढावा

पीएम किसान पेन्शन योजनेचे लाभार्थी

४,८७,५५७

आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी

६,०७६

पैसे परत करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी

१२,६२९

पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी

६,५५०

--इन्फो--

आतापर्यंत ६१ लाख झाले वसूल

१) शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची पेन्शन तर तीनमहा याप्रमाणे जमा केली जाते. यामध्ये अनेक अपात्र शेतकऱ्यांचादेखील समावेश आहे. आतापर्यंत अशा ६१,६७,०००० इतक्या शेतकऱ्यांकडून रक्कम जमा करण्यात आलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.

२) पीएम किसान योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी करदाते शेतकऱ्यांची संख्या मोठी असून त्यांची माहिती एकत्रित करून त्यांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. एकूण नोटीस पाठविलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही १२,६२९ इतकी असून त्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा पाठविण्याची वेळ आलेली आहे.

३) काही अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन ते तीन पेक्षा अधिक हप्तेदेखील जमा झाल्याची बाब उघड झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार नोटीस पाठविली जात आहे. पहिली वसुली झाल्यानंतरही अनेकांच्या खात्यावर दुसरी रक्कमही जमा झालेली आहे.

--इन्फो--

काही शेतकरी अजूनही लाभावाचून वंचित

दर तीन महिन्यांनी २ हजार या प्रमाणे शेतकऱ्यांना पेन्शन देणारी ही योजना आहे. यातील पात्र अपात्रतेबाबतचा घोळ कायम असताना जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याच्यादेखील तक्रारी अनेकदा समोर आलेल्या आहेत. सर्व निकष पूर्ण करीत असतानाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नसल्याचे सांगण्यात येते. बँकांमध्ये गेल्यानंतर पैसे जमाच झाले नसल्याचे सांगितले जाते. काही शेतकऱ्यांना केवळ पहिला हप्ता मिळतो तर नंतरच्या दोन हप्त्यांसाठी प्रतीक्षा करावी लागते. काहींना तीनही हप्ते मिळतात तर काहींना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागते. पेन्शन योजनेतील या घोळात अनेक उशिरा जमा होणाऱ्या निधीमुळेदेखील गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.