शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिकेसाठी ६० टक्के मतदान

By admin | Updated: May 25, 2017 02:00 IST

मालेगाव : महानगरपालिका निवडणुकीसाठी आज, बुधवारी ५९.५२ टक्के मतदान झाले. उद्या, शुक्रवारी मतमोजणी होणार असून, उमेदवारांसह शहरवासीयांचे निकालाकडे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : महानगरपालिका निवडणुकीसाठी आज, बुधवारी ५९.५२ टक्के मतदान झाले. उद्या, शुक्रवारी मतमोजणी होणार असून, उमेदवारांसह शहरवासीयांचे निकालाकडे लक्ष लागून आहे.  पूर्व भागात कॉँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस-एमआयएमच्या तसेच पश्चिम भागात शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा प्रकार व नांदेडी शाळेतील मतदान केंद्रावर काही काळ निर्माण झालेली तणावाची परिस्थिती वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. कॅम्प भागातील एका मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. रिंगणातील ३७३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे स्ट्रॉँग रूममध्ये ठेवण्यात आली. शहराच्या पूर्व भागात मतदारांनी मतदानासाठी सकाळपानच रांगा लावल्या होत्या.  दुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदारांची संख्या घटली होती. मात्र दुपारनंतर मतदार घराबाहेर पडल्याने पुन्हा मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली. यात महिला वर्गाचा उत्साह अधिक दिसून येत होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर वृद्ध व दिव्यांगांसाठी महापालिकेने खास वाहनांची व्यवस्था केल्याने त्यांची मोठी सोय झाली.  दरम्यान, पश्चिम भागात मोसमपूल परिसरात राज्यमंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे व नगरसेवक सुनील गायकवाड यांचे पुत्र दिपक गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. यामुळे धावपळ उडाली होती तर विद्यमान नगरसेवक सखाराम घोडके व नरेंद्र सोनवणे यांच्या समर्थकांमध्येही हाणामारीचा प्रकार घडला. सोनवणे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, या हाणामारीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.