शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडची ६० टक्के कामे अद्याप अपूर्ण

By admin | Updated: October 30, 2014 23:34 IST

अनेक अडथळे : अधिकाऱ्यांना पुन्हा ‘अच्छे दिन’ची अपेक्षा

नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाजत गाजत सुरू केलेल्या रिंगरोडच्या कामांना ब्रेक बसला आहे. अपुरा निधी आणि वृक्षप्रेमींचा विरोध यामुळे ही कामे आत्तापर्यंत जेमतेम ४० टक्के इतकीच पूर्ण झाली आहेत. आता राज्यात नवीन सरकार आल्यानंतर निधीचा प्रश्न सुटेल आणि त्यानंतर या कामांना गती मिळेल, अशी आस आता प्रशासन बाळगून आहे.आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अंतर्गत वळण मार्ग आणि बाह्य वळण मार्ग साकारले जात आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यात दर्शविलेले रिंगरोड तयार करण्यासाठी पालिकेला तब्बल २२ वर्षे लागली आहेत. ४६५ कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ही कामे त्वरित पूर्ण होतील असे सांगितले जात होते. शिवाय एका मार्गावरून शहराबाहेर पडण्यासाठी अवघ्या १५ मिनिटांचा कालावधी लागेल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र हे रस्ते कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.सदरचे अनेक रस्ते तयार करताना मुळातच भूसंपादनास अडथळे आले. त्यामुळे जनार्दनस्वामी मठामागील बाजू तसेच उंटवाडी ते सपना थिएटर तसेच जेहान सर्कल ते गंगापूर गाव अशा अनेक ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर दिंडोरीरोड, गंगापूररोडसारख्या ठिकाणी वृक्षतोडीस नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने हरकतींच्या सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वृक्षतोडीस मज्जाव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे निधीची चणचण हा गंभीर प्रश्न आहे. पालिकेकडे कोट्यवधी रुपयांची देयके थकल्याने रिंगरोडच्या कामांना गती मिळालेली नाही. दिवाळीत काही प्रमाणात ठेकेदारांना देयके मिळाली असली, तरी आता मुख्यत्वे केंद्र आणि राज्य शासनाकडून निधीची अपेक्षा आहे. केंद्राप्रमाणे राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर आता केंद्र शासन निधीचा विषय हाती घेईल असे सांगण्यात येत असून, त्यामुळे पालिकेला ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)