शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:53 IST

नाशिक : विदर्भापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही कापूस पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पादनावर सुमारे ६० टक्के परिणाम झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी खात्याने केलेल्या पीक पंचनाम्याच्या अहवालानुसार सुमारे २५ हजार हेक्टरवरील पीक बोंडअळीने नष्ट केले

ठळक मुद्देमालेगाव, येवला, नांदगावला फटका २५ हजार हेक्टर बाधित

नाशिक : विदर्भापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही कापूस पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पादनावर सुमारे ६० टक्के परिणाम झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी खात्याने केलेल्या पीक पंचनाम्याच्या अहवालानुसार सुमारे २५ हजार हेक्टरवरील पीक बोंडअळीने नष्ट केलेअसून, त्याचा फटका मालेगाव, येवला व नांदगाव तालुक्यातील शेतकºयांना सर्वाधिक बसला आहे. (पान २ वर)दीड महिन्यापूर्वी बीटी कॉटनवर फवारणी करण्यासाठी वापरल्या जाणाºया काही कंपन्यांच्या सदोष औषधामुळे बोंडअळीचा झपाट्याने प्रादुर्भाव झाला आहे. प्रारंभी विदर्भापुरताच हा प्रश्न मर्यादित असल्याचे मानले जात होते. तथापि, डिसेंबरमध्ये जिल्ह्णात काढणीला आलेल्या कापसावरही त्याचा परिणाम दिसू लागल्याने अनेक शेतकºयांनी बोंडअळीचा अन्यत्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाचे पीकच उखडून नष्ट केले तर काहींना त्यावरही औषध फवारणी करून नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टीचा विचार करता शासनाने अखेर बोंडअळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले. नाशिक जिल्ह्णात प्रामुख्याने मालेगाव, येवला, नांदगाव, देवळा, सटाणा, निफाड, चांदवड व सिन्नर या तालुक्यात कमी- अधिक प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. साधारणत: ४६३२० हेक्टर क्षेत्र कपाशीचे असून, त्यातील बोंडअळीमुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान २५३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे झाले आहे. म्हणजेच लागवड केलेल्या क्षेत्रापैकी ६० टक्के पीक शेतकºयांच्या हातातून गेले असल्याने यंदा कपाशीचे उत्पन्न कमालीचे घटणार आहे. कृषी खात्याने प्राथमिक पातळीवर सदरचे पंचनामे केले असून, अंतिम नुकसान निश्चिती करण्यास अवधी असला तरी, सर्वाधिक फटका मालेगाव, येवला व नांदगाव तालुक्याला बसला आहे.पंचनामे बाकीनांदगाव तालुक्यात बोंडअळीने शिरकाव करताच तेथील शेतकºयांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीची झाडे उपटून टाकली आहेत. त्यामुळे शेतात कापूस दिसत नसल्याने त्यांचे पंचनामे करण्यात कृषी खात्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यात फक्त ३१ टक्के व बागलाणमध्ये ६३ टक्के पंचनामे होऊ शकले आहेत. हे पंचनामे झाल्यास नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.