शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आडगावला ६० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST

पंचवटी : आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात रस्त्यावर संशयास्पद उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये तब्बल ६० किलो ...

पंचवटी : आडगाव शिवारातील नववा मैल परिसरात रस्त्यावर

संशयास्पद उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये तब्बल ६० किलो बेवारस गांजा आढळून आला आहे. आडगाव पोलिसांनी घटनास्थळावरून सहा लाख रुपये किमतीचा गांजासह सात लाख रुपयांची कार असा एकूण सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अंमली पदार्थ कायदा कलम अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. सदर गांजा कुठून आणला व कोणाला पुरविला जात होता याबाबत पोलिस शोध घेत आहेत.

शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी भास्कर वाढवणे, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी, दिनकर भुसारे आदी कर्मचारी दहावा मैल परिसरात गस्त घालत असताना नववा मैलजवळ एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार पार्किंग लाइट सुरू करून उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी गाडी जवळ जाऊन पाहिले असता गाडीत दोन गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू दिसून आल्या. त्यानंतर सदर माहिती रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक अशोक साखरे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक हेमलता उबाळे यांना कळविण्यात आली. पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. गाडीचा दरवाजा उघडला असता मागील सीटवर दोन गोण्या आढळून आल्या. त्या उघडून बघितल्या असता त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

इन्फो बॉक्स

पोलिसांना पाहून पलायन

मध्यरात्रीच्या सुमाराला आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी दहावा मैल परिसरात गस्त घालत असताना गांजा वाहतूक करणाऱ्या संशयितांनी लांबून येणारे पोलीस वाहन बघितले. त्यानंतर गाडीमध्ये गांजाचे पोते तसेच ठेवून गाडी सोडून पलायन केले. सदर गाडी मालेगावच्या दिशेने जात असल्याने संशयित मालेगाव भागातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आडगाव परिसरात पहिल्यांदाच एवढा गांजा आढळून आल्याने काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गांजा जप्त केला होता त्यामुळे सदर गांजा माल नेमका कोणाचा याबाबत पोलिस शोध घेत आहेत.