शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

उद्यान विभागात 6 कोटींचा गोंधळ

By admin | Updated: July 19, 2014 01:04 IST

लेखापरीक्षण : चार कोटींच्या कामांची कागदपत्रेच गहाळ

नाशिक : विनानिविदा कामे देणे आणि अन्य प्रकारांतून उद्यान विभागात तब्बल सहा कोटी ८९ लाख ८३ हजार रुपयांचा गोंधळ झाल्याचे आढळले आहे. स्थानिक लेखापरीक्षणात उद्यान विभागावर हा ठपका ठेवण्यात आला असून, त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळल्याने लोकप्रतिनिधी आता त्यावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.पालिकेत या आधीही उद्यान विभागाचा कोटेशन घोटाळा गाजला होता. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामे निविदा मागवून न करण्याची गरज असताना तसे झाले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. त्यातच आता आक्षेप आला आहे. महापालिकेचे २०११-१२ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, त्यात या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. अहवाल वर्षात विविध उद्याने आणि बेंचेस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. परंतु उद्यान विभागाने २००७-०८ व २००८-०९ या आर्थिक वर्षात जी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात प्राप्त झालेल्या दरानुसार निवडक मक्तेदारांकडूनच खरेदी करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार अशा प्रकारे मागील निविदांचा विचार केला तर अगोदरच्या दोन वर्षांच्या कालावधीतील निविदांचे दर आणि मक्तेदार विचारात घेतले जाऊ शकतात. शिवाय ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी ही निविदा मागवूनच करणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने खरेदी पद्धत सदोष असल्याचे निष्पन्न झाले असून, महापालिकेने त्यात महापालिकेचे हित जोपासण्यात आले नाही तर दीपक एजन्सी या संस्थेस लाभ करण्याच्या उद्देशाने कृती करण्यात आली. या वर्षभरात खेळणी आणि बेंचेस खरेदीत पालिकेचे दोन कोटी सात लाख ५२ हजार ५४९ रुपयांचे आक्षेपाधिन रक्कम असल्याचे लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सुमारे चार कोटी रुपयांच्या अन्य कामांतील अनेक कामांच्या संचिकाच लेखापरीक्षकांना उपलब्ध करून न देण्यात आल्याने या रकमेवरदेखील आक्षेप घेण्यात आला आहे.उद्यान विभागाने पाच लाख रुपयांच्या आतील कामे काही विशिष्ट मजूर संस्थांना दिल्याचेही आढळून आले आहे, अशा कामांसाठी कामाची नोंदवहीच ठेवण्यात आलेली नाही. कोणत्या मजूर संस्थेला किती कामे दिली गेली, हे स्पष्ट झाले नाही. इतकेच नव्हे तर विविध मर्यादेचे उल्लंघन करून काम केले किंवा नाही हेदेखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. (प्रतिनिधी)