येवला : तालुक्यातील ६ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर तालुक्यातील ७ संशयीतांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दरम्यान, ३७ अहवालांची प्रतीक्षा आहे.मंगळवारी, (दि. १३) तालुक्यातील ४२ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. तर प्रतीक्षेतील ३५ स्वॅब अहवालात ६ संशयीतांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. यात ५ येवला तालुक्यातील असून एक तालुक्या बाहेरील आहे. बाधितांमध्ये येवला शहरातील पटेल कॉलनीतील २, तालुक्यातील दहेगाव पाटोदा येथील २ व अंगणगाव येथील एकाचा समावेश आहे.बुधवारी, (दि. १४) ५९ अहवालांपैकी २२ अहवाल प्राप्त झाले. यात ७ संशयीतांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. बाधितांमध्ये तालुक्यातील अनकाई येथील ४, देशमाने येथील २ तर पाटोदा येथील एकाचा समावेश आहे. बाभुळगाव येथील अलगीकरण केंद्रातून ३ तर होम कोरंटाईन ३ असे एकुण ६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ८७८ झाली असून आजपर्यंत ७८० बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आतापर्यंत ४८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ५० असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.