शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५८ टक्के रब्बीच्या पेरण्या पूर्ण; थंडीची उणीव : गहू, हरभऱ्यासह मका लागवडीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST

यंदा मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामातील पिकांची जोरदार तयारी सुरू असली तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या थंडीने आठ दिवसापासून पाठ ...

यंदा मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी हंगामातील पिकांची जोरदार तयारी सुरू असली तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या थंडीने आठ दिवसापासून पाठ फिरवल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होत आहे. शिवाय थंडी गेली आणि ढगाळ हवामान झाल्यास पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. मावा वाढला की पिकांची वाढ थांबते. कांदे आणि गव्हाच्या पिकासाठी जोरदार थंडीची आवश्यकता आहे; मात्र थंडी नसल्याने पिके १५ दिवसांची लागवड होऊनही जमीन सोडायला तयार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नाशिक जिल्ह्यात बागलाण, येवला, सिन्नर, चांदवड भागांमध्ये पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे तर नाशिक, निफाड, दिंडोरी या भागांमध्ये पेरणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत गव्हाची ४४ टक्के, मका ८४ टक्के, हरभऱ्याची ५२ टक्के तर ज्वारीची १९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात येत्या आठवड्यामध्ये १०० टक्के रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत पूर्ण झालेल्या पेरण्या (हेक्टरमध्ये)

तालुका / सरासरी क्षेत्र / झालेली पेरणी / टक्के

निफाड : १७८१ ९६९ ११३९

बागलाण : ११७२ ५१०२ ८५८७

मालेगाव : ८०७० ७२१३ ८९

पेठ : १७०५ ९८१ ३७

सिन्नर : १७१०९ १०५४१ ५७

येवला : १०९६७ १०३४७ ५८

नांदगाव : ५१४३ ५१२६ १०१

चांदवड : ७१२० २१५३ ४१

दिंडोरी : १०८८६ ६३२४ ५८

नाशिक : ३६८० ३०५० ८४

सुरगाणा : २८०३ १२०८ ४३

त्र्यंबकेश्वर : २०९७ ५०८ २३

कळवण : ७९९३ २०८३ ३५

देवळा : २७१३ ७४१ ३०