शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

५७ हजार नळजोडणीधारकांना अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:15 IST

महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील १० हजार ५५० थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ५७ हजार थकबाकीदारांनी भरणा न केल्याने संबंधितांची नळजोडणी बंद केली जाणार आहे. याशिवाय बंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.

नाशिक : महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील १० हजार ५५० थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ५७ हजार थकबाकीदारांनी भरणा न केल्याने संबंधितांची नळजोडणी बंद केली जाणार आहे. याशिवाय बंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.  महापालिकेने करवसुलीसाठी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टी थकविणाºया ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातील १० हजार ५५० नळजोडणीधारकांनीच थकबाकीचा भरणा भरण्यास प्रतिसाद दिलेला आहे. सदर थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जे नळजोडणीधारक १५ दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरणार नाहीत, अशा नळजोडणीधारकांची जोडणी बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत १९ कोटी ९७ लाख रुपये पाणीपट्टी वसूल केलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टी वसुलीत ९ कोटी २९ लाख रुपयांनी वाढ झालेली आहे. सर्वाधिक पाणीपट्टीची वसुली सिडको विभागातून ४ कोटी ७८ लाख रुपये झाली आहे, तर सातपूर विभागातून २ कोटी ५ लाख, पश्चिममधून ३ कोटी, पूर्वमधून ३ कोटी ५१ लाख, पंचवटीतून २ कोटी ७१ लाख, नाशिकरोडमधून ३ कोटी ८९ लाख रुपयांची वसुली झालेली आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत अद्यापही असंख्य नळजोडणीधारकांना पाणीपट्टीची बिले जाऊन पोहोचलेली नाही. सुमारे वर्षभराच्या कालावधीत पाणीपट्टीची बिले न मिळाल्याने सोसायट्या, अपार्टमेंट यांना येणाºया बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे महापालिकेकडे त्याबाबत विचारणा होण्याची शक्यता आहे. मालमत्ता करात १२ कोटींनी वाढमहापालिकेने गत वर्षाच्या तुलनेत १२ कोटी ५८ लाख रुपये जास्त घरपट्टीची वसुली केली आहे. गतवर्षी सात महिन्यांत ४५ कोटी १८ लाख रुपये मालमत्ताकर वसूल झाला होता. यंदा सात महिन्यांत ५७ कोटी ७६ लाख रुपये वसुली झाली आहे. महापालिकेने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत योजना राबविली होती. या सवलत योजनेतूनच महापालिकेला ३४ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. त्यानंतरच्या चार महिन्यांत महापालिकेने २३ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. सौर ऊर्जेचा वापर करणाºया ७६४४ मिळकतधारकांना ७ लाख ८० हजारांची तर पाच, तीन आणि दोन या टक्केवारीतून ८९ लाख रुपये सवलत देण्यात आलेली आहे. ई पेमेंट करणाºया ४१ हजार ८२१ ग्राहकांना ६ लाख ४१ हजाराची सवलत देण्यात आलेली आहे.