नाशिक : सन् २०१७ ते २०२२ या पाचवर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूकीत एकूण ५५.७२ टक्के मतदान झाले असून सावानाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आहे.१७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूकीसाठी रविवारी (दि. २) वाचनालयाच्या मु.शं.औरंगाबादकर सभागृहात मतदान घेण्यात आले . १८ जागांसाठी होणा-या या मतदानासाठी ५५.७२ टक्के मतदान झाले असून यामध्ये १११६ आजिवन तर ८७९ वार्षिक वाचनालयाच्या सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. वार्षिक सभासदांच्या तुलनेत आजिवन सभासदांनी यंदाच्या निवडणूक ीत मोठ्या संख्येने मतदान केले आहे. यंदाच्या निवडणूकीत प्रामुख्याने तिरंगी लढत पहायला मिळाल्याने त्यातच या निवडणूकीचा सगळयाच पॅनलकडून ‘हायटेक’ प्रचार झाल्याने अवघ्या साहित्यक्षेत्राचे याकडे लक्ष लागले आहे. या मतदानासाठी एकूण सात बुथ लावण्यात आली होती, यामध्ये १ ते ३ क्रमांकांच्या बुथवर आजिवन तर ४ ते ७ क्रमांकांच्या बूथवर वार्षिक सभासदांसाठी मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. रविवारी सकाळी नऊ वाजेपासूनच मतदान प्रक्रि येला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली असली तरी दुपारी मात्र मतदानासाठी येणा-या सभासदांचे प्रमाण कमी होते. आजिवन सभासदांची मतदानाला होणारी गर्दी लक्षात घेता एक ते तीन क्रमांकांच्या बुथ वर सकाळी साडे अकरा वाजेनंतर अतिरिक्त टेबल मांडण्यात आले.उमेदवारांनी अवलंबलेली प्रचाराची पध्दत त्यातच साहित्यक्षेत्रातील मान्यवरांशिवाय राजकारणी, बांधकाम व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी या निवडणूकीत नशीबआजमवण्याचा केलेला प्रयत्न यामुळे ही निवडणूक सगळयांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणूकीत अनेक राजकारणी व्यक्तींनींही ठाण मांडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीप्रमाणेच विविध घडामोडी या निवडणूकीदरम्यान घडल्या, याचाच प्रत्यय मतदानाच्या दिवशीही पहायला मिळाला. निवडणूकीतील उमेदवारांपेक्षा पॅनलच्या समर्थकांचीच गर्दी मतदाना दरम्यान सावानाच्या आवारात बघायला मिळाल्याने या निवडणूक ीला न भुतो न भविष्यती अशी गर्दी बघायला मिळाली. मतदान करण्यासाठी येणा-या प्रत्येक मतदाराला उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गराडा घालून आपल्यालाच मत मिळावे यासाठी विनवणी केली.
‘सावाना’ निवडणूकीसाठी ५५.७२ टक्के मतदान : प्रथमच उच्चांकी मतदान
By admin | Updated: April 2, 2017 21:40 IST