मालेगाव : येथील महानगरपालिकेतर्फे मंगळवारी पुन्हा आझादनगर भागात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. या राबविण्यात आलेल्या मोहिमेत फत्तेह मैदान जामेतुल स्वालयाद ते मालेगाव हायस्कूलदरम्यान ५२ अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे यांनी दिली आहे. येथील महापालिकेने मंगळवारी सकाळी या मोहिमेला सुुरुवात केली. यावेळी व्यापारी गाळ्यांसह पक्के बांधकाम आदि अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी साहित्य जप्त केले. या मोहिमेत प्रभाग अधिकाऱ्यांसह बिट मुकादम विष्णु जेधे, अजय चांगरे, शैलैश सोळंकी, जगदीश सुपारे, दिनेश मोरे, जुबेर अहमद यांच्यासह अतिक्रमण गस्ती पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
आझादनगरात ५२ अतिक्रमणे जमीनदोस्त
By admin | Updated: February 2, 2016 23:22 IST