शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५१ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:11 IST

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. शुक्रवारी (दि.८) दिवसभरात तब्बल ५१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ कायम असल्याने बाधितांचा आकडा थेट ५७२ वर पोहोचला आहे.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. शुक्रवारी (दि.८) दिवसभरात तब्बल ५१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ कायम असल्याने बाधितांचा आकडा थेट ५७२ वर पोहोचला आहे.मालेगावात कोरोनाचा कहर सुरू असताना नाशिक शहरातदेखील शुक्रवारी (दि.८) तब्बल १८ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांचा आकडा थेट ४४ वर पोहोचला आहे. नाशिक शहरात सातपूर कॉलनी, सिडको, पाटीलनगर, हिरावाडी भागातील १३ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. त्यात सात जणांना सातपूर कॉलनीतील एका पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे. शहरातील अन्य पाच बाधित नाशिकच्या धात्रकफाटा, इंदिरानगर, तारवालानगर, कोणार्कनगर भागातील आहेत.  शुक्रवारी दिवसभरात मालेगावसह ग्रामीण नाशिकमध्ये ३३ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने ही संख्या ५१ वर पोहोचली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा थेट ५७२ वर गेला आहे. जिल्ह्यात प्रथमच दिंडोरी तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला असून, दिंडोरीनजीकच्या गावातील ग्रामस्थदेखील बाधित आढळून आला आहे.चांदवड तालुक्यातील एक बाधित यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णाचा नातेवाईक आहे. तर मालेगाव येथे कोरोनामुक्तीसाठी आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येत आहे. २६ एप्रिल ते ७ मे या १२ दिवसांच्या कालावधीत ४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. केवळ हीच बाब यंत्रणेच्या दृष्टीने काहीशी दिलासादायक ठरत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक