शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका सभेत ५१ विषयांना मंजुरी

By admin | Updated: March 22, 2017 00:47 IST

येवला : विस्थापितांना गाळे द्या, पथदीप पुर्ववत सुरू करा, गावाच्या तिन्ही मुख्य चौफुलींवर सिग्नल्स बसवावे, भुयारी गटारीचा नव्याने प्रस्ताव पाठविण्यासह ५१ विषयांना सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

येवला : विस्थापितांना गाळे द्या, पथदीप पुर्ववत सुरू करा, गावाच्या तिन्ही मुख्य चौफुलींवर सिग्नल्स बसवावे, भुयारी गटारीचा नव्याने प्रस्ताव पाठविण्यासह ५१ विषयांना येवला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. गुरुवारी नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सुरज पटणी, मुख्याधिकारी राहुल वाघ उपस्थित होते. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी प्रास्ताविकेतून सर्व योजनांची माहिती सभागृहाला दिली. सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. नवनिर्वाचित सदस्यांनी विविध विषयांबाबत प्रश्न उपस्थित करून माहिती जाणून घेतली. तसेच प्रभागातील विविध समस्या व  नवीन विकासकामे करण्याबाबत सूचना दिल्या.सर्वप्रथम मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. येवला शहर पाणीपुरवठा योजनेचा व भुयारी गटार योजनेचा आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाने निधी देताना येवला नगरपालिकेला डावलले. राज्य शासनाकडे नगरोत्थान अंतर्गत फेरप्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आाला. दोन वर्षांपासून बंद असलेल्या येवला-कोपरगाव रोडवरील पथदीप टोल कंपनीकडून हस्तांतरित करून पथदीप पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. विंचूर चौफुली, फत्तेबुरुज नाका व गंगादरवाजा नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल्स बसविणे, तसेच या भागातील पादचारी/ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भुयारीमार्ग तयार करण्याबाबत विचार-विनिमय करण्यात आला. महात्मा फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापन बदलून पालिकेने ताब्यात घेण्याचा निर्णय झाला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत येवला शहराची स्वच्छतेची वाटचाल निश्चित करण्यात आली. चौदाव्या वित्त आयोगाच्या प्राप्त होणाऱ्या निधीतून स्वच्छताविषयक व इतर विकासकामे करणे. पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनिमयन योजना २०१७ अन्वये अंमलबजावणी करणे. नगरपालिकेने तात्पुरत्या स्वरुपाने भाड्याने दिलेल्या जागांचे मोजमाप करून त्यानुसार भाडे आकारणी करणे. नागड दरवाज्यालगत बांधलेल्या गाळ्यांना नियमानुसार भाडे आकारणी करणे याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, शेख परवीन बानो निसार, शेख तेहसीन अ. रज्जाक, शेख निसार, मोमीन सबिया अ. सलीम, शेख रईसा बानो शेख उपस्थित होते. (वार्ताहर)