शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

५० हजार नाशिककरांनी ना वाहतुकीचा नियम पाळला, ना दंड भरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:14 IST

नाशिक : शहर व परिसरातील वाहतुकीला शिस्त लागावी अन‌् शहरातील वाहतूक आदर्श वाहतूक ठरावी, यासाठी नाशिककरांनी वाहतुकीचे नियम कटाक्षाने ...

नाशिक : शहर व परिसरातील वाहतुकीला शिस्त लागावी अन‌् शहरातील वाहतूक आदर्श वाहतूक ठरावी, यासाठी नाशिककरांनी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पालन करणे गरजेचे असताना याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत मागील वर्षी काही वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटवीत वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अडकलेल्यांपैकी सुमारे ५० हजार ९१० नाशिककरांनी शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेला दंड थकविला आहे.

शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून शहर वाहतूक शाखेने नियोजनबद्ध पद्धतीने काही रस्त्यांवर नो पार्किंग, तर काही रस्त्यांवर एकेरी प्रवेश, तर काही ठिकाणी ‘प्रवेश बंद’ असे विविध फलक महापालिकेच्या माध्यमातून, तसेच खासगी प्रायोजकांमार्फत लावून घेतले आहे; मात्र याकडे नागरिकांकडून सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून ठिकठिकाणी तपासणी करीत दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र मागील वर्षभरात बहुतांश वाहनचालकांनी शहर वाहतूक शाखेने केलेला दंड थकविला आहे. यामध्ये बड्या लोकांचा समावेश अधिक आहे. कारण नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून, सुमारे २७ हजार ८९ लोकांनी नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यामुळे झालेला दंड अद्यापही भरलेला नाही. त्याचप्रमाणे वेगमर्यादेचे कुठलेही भान न बाळगता भरधाव वाहने दामटविणाऱ्यांमध्येही चारचाकी चालकांची आघाडी असल्याचे दिसून येते. २५ हजार ६९३ लोकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. त्यापैकी २१ हजार ११४ लोकांनी दंडाची रक्कम थकविली आहे.

----इन्फो---

...तर वाहन परवाना रद्द

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत ६९८ वाहनचालकांचे परवाने प्रादेशिक परिवहन विभागाकडून रद्द करण्यात आले आहे. तसेच १ एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ११८ वाहनचालकांचे परवाने रद्द केले गेले आहे. एकूण ८१६ नाशिककरांचे वाहन परवाने ९० दिवसांकरिता रद्द करण्यात आले आहे.

----आलेख---

अशी आहे आकडेवारी

नो पार्किंग- कारवाई झालेले वाहनचालक- ३४,८१४

वाहनचालकांकडील थकीत दंड - २७०९१

----

ट्रीपल सीट- कारवाई झालेले वाहनचालक - २,६७३

वाहनचालकांचे थकीत दंड - ४,१२०००

------

मोबाईलवर बोलणे - कारवाई झालेले वाहनचालक- ३,३२५

वाहनचालकांचे थकीत दंड- २,६७८

---

अधिक वेग - कारवाई झालेले वाहनचालक- २५,७०५

वाहनचालकांचे थकीत दंड- २१,११४

----

ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह- कारवाई झालेले वाहनचालक-१५२

वाहनचालकांकडील थकीत दंड- १,४९,५००

---

डमी फॉरमेट आर वर जेपीजी/ १४ट्रॅफिक फॉरमेट फाइन नावाने सेव्ह आहे.

फोटो - आर वर १४ट्रॅफिक फाइन१/२ नावाने सेव्ह आहे.