शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीयोजनेत ५० टक्के कपात

By admin | Updated: June 5, 2016 00:06 IST

जलसंकट : चार दिवसाआड होणारा पाणीपुरवठा होणार आठवड्यानंतर

 सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या वावीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेवर गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच जलसंकट ओढावले आहे. योजनेच्या तळ्यात पाणीसाठा कमी राहिल्याने व आवर्तन सुटण्यास उशीर असल्याने ५० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा वावीचे उपसरपंच विजय काटे यांनी दिली. गेल्या पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वावीसह अकरा गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीयोजना राबविण्यात आली आहे. या पाणीयोजनेमुळे वावी व परिसरातील दहा गावांना गेल्या चार वर्षांत अजिबात पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र यावर्षी या योजनेवर पाणीकपातीची वेळ आली आहे. वावी, कहांडळवाडी, मिठसागरे, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव, मिरगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी व शहा या ११ गावांचा समावेश या पाणीयोजनेत करण्यात आला आहे. गोदावरी उजव्या कालव्याजवळ कोळगावमाळ शिवारात मोठा तलाव करून त्यात पाणी साठविण्यात आले आहे. या तलावाशेजारीच जलशुद्धीकरण केंद्र असून त्याद्वारे योजनेतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. शिर्डी व राहाता पाणीयोजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्याला दर दोन महिन्यांतर आवर्तन सुटते. त्यावेळी या योजनेचे तळे भरले जाते. मात्र सध्या आवर्तन सुटण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे तळ्यातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या तळ्यात केवळ १ ते सव्वा मीटर पाणी शिल्लक आहे. पाऊस झाल्यानंतर गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सुटू शकते. त्यामुळे तळ्यातील पाणी आवर्तन सुटेपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे पाणीयोजनेत समाविष्ट असणाऱ्या अकरा गावांचा पाणीपुरवठा ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या गावांना चारऐवजी आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळणार आहे. गोदावरी कालव्याला पाणी सुटल्यानंतर या योजनेवरील जलसंकट दूर होईल. गेल्या चार वर्षांत वावीसह अकरा गावांना वरदान ठरणारी पाणीयोजना यावर्षीच्या दुष्काळामुळे संकटात सापडली आहे. (वार्ताहर)