शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पर्यटनस्थळ विकासासाठी ५० लाखांचा निधी

By admin | Updated: January 9, 2017 00:44 IST

हतगड : महाराष्ट्र वनविभागाने गुजरात राज्याच्या कामाचा आदर्श घ्यावा

 कनाशी : सुरगाणा तालुक्यातील हतगड पर्यटनस्थळासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून अविकसित असलेल्या हतगड किल्ल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास खात्यामार्फत संवर्धन करण्यात येणार आहे. या ठिकाणी आकर्षक पर्यटनस्थळ उभारण्यात येणार असून, यासाठी शासनाकडून ५० लाख रुपये निधी कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती हतगड यांच्या खात्यावर प्राप्त झाला आहे.कनाशी वनपरिक्षेत्र कार्यकक्षेतील हतगड किल्ला हा पर्यटनस्थळ होण्यासाठी वनसंरक्षक अरविंद पाटील व मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकासाच्या बैठकीत आकर्षक पर्यटनस्थळ तयार करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील हतगड किल्ल्याची निवड झाली आहे. त्यानुसार किल्ल्याचा पुरातत्व विभागमार्फत विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये किल्ल्यावर असलेल्या पुरातत्व वस्तू, प्रेक्षणीय ठिकाणे, धान्य गुदामे, तबेले यांची आजची स्थिती याबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. किल्ल्याची विकासकामे होणार असल्याची माहिती अमोल आढे यांनी दिली. किल्ल्यावरती जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला पाइप रेलिंग, किल्ल्याच्या पायऱ्या दुरुस्ती, दरड प्रतिबंधक जाळ्या, मजुरांसाठी निवारा शेड, व्यवस्थापन विभागासाठी दोन खोल्या, मुख्य प्रवेशद्वार, संपूर्ण किल्ल्याच्या परिसराला लोखंडी संरक्षक जाळ्या व डागडुजी आदि विकासकामे गेल्या दोन वर्षांत झाली आहेत. या किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. किल्ल्याच्या निम्म्या भागापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहने जातात. विकासकामांमुळे पर्यटकांना किल्ल्यावर लवकरात लवकर पोहोचणे शक्य होणार असून, वेळ व श्रम वाचणार आहेत. किल्ला संवर्धन व विकास कार्यक्रमांतर्गत हे आकर्षक पर्यटनस्थळ होणार असून, त्याबाबत वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. (वार्ताहर)