शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सीएसआर निधीतून ५० लाखांची यंत्रसामग्री : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:38 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील अर्भक मृत्यूमुळे समोर आलेल्या उपकरणांच्या कमतरतेचा प्रश्न कंपन्यांच्या सीएसआर (कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व) निधीतून मार्गी लावण्यात आला असून, येत्या पंधरा दिवसांत सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचे साहित्य जिल्हा रुग्णालयात फिट करण्यात येणार असल्याचे असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि़१८) पत्रकार परिषदेत सांगितले़ जिल्हा ...

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील अर्भक मृत्यूमुळे समोर आलेल्या उपकरणांच्या कमतरतेचा प्रश्न कंपन्यांच्या सीएसआर (कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व) निधीतून मार्गी लावण्यात आला असून, येत्या पंधरा दिवसांत सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचे साहित्य जिल्हा रुग्णालयात फिट करण्यात येणार असल्याचे असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि़१८) पत्रकार परिषदेत सांगितले़ जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागाला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़पालकमंत्री महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासह अधिकाºयांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन एसएनसीयू (स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट) भेट देऊन पाहणी केली़ यानंतर जिल्हा रुग्णालयात २१ कोटी रुपये मंजूर असलेल्या अद्ययावत माता-बालक संगोपन इमारतीची जागा, अतिदक्षता विभाग या ठिकाणांची पाहणी करून कमतरता असलेल्या उपकरणांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली़महाजन यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी कमतरता असलेल्या उपकरणांबाबत फिनोलेक्स कंपनीचे प्रकाश छाब्रिया यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, त्यांनी आपल्या ट्रस्टच्या सीएसआर निधीतून सुमारे ५० ते ६० लाख रुपयांची यंत्रसामग्री देण्यास मंजुरी दिली आहे़ या निधीतून एसएनसीयू विभागासाठी १६ बेबी वॉर्मर, १० फोटोथेरेपी, १५ पल्स आॅक्सीमीटर, २० सिरिंज पंप, एक बिलीरुबीनो मीटर, एक मोबाइल एक्स रे युनिट येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत रुग्णालयास मिळणार आहे़ याबरोबरच अतिदक्षता विभागात आणखी पाच व्हेंटिलेटर्स मिळणार आहेत़फिनोलेक्स कंपनीबरोबरच आणखी एका कंपनीसोबत सीएसआर निधीबाबत चर्चा होऊन सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे़ या निधीतून जिल्हा रुग्णालयातील उपकरणांचा प्रश्न मार्गी लावला जाणार असून, याखेरीज शासन स्तरावरूनही निधी उपलब्ध केला जाईल, मात्र त्याच्या प्रक्रियेसाठी कालावधी लागणार असल्याने सीएसआर निधीचा पर्याय शोधल्याचे महाजन यांनी सांगितले़