शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये ३१मार्चपर्यंत शिक्षक, शिक्षकेत्तरांची ५० टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीत काम करण्याच्या सुचना केल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या ...

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीत काम करण्याच्या सुचना केल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागानेही सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ५० टक्के उपस्थितीतच कामकाज करण्याचे आदेश दिले असून याविषयी अंमलबजावणीची जबाबदारी संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच अकरावी सह पहिली ते नववीच्या जिल्ह्यातील सर्व शा‌ळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सुचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ती कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून पालकांच्या संमतीने वर्ग सुरू ठेण्याची सवलत देण्यात आली होती. त्यानंतरर आता शिक्षण विभागाने शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही ५० टक्के उपस्थितीत कामकाज करण्याच्या सुचना केल्या असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा व अन्य महत्वाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांसह शासनाच्या आदेशानुसार कार्यावाही करण्याच्या सुचना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयांच्या मुख्याध्यापकांना केल्या आहेत.