शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

गंगापूर धरणातून गोदापात्रात ५ हजार क्युेसकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 16:14 IST

गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला आहे. काश्यपी ९७.६२ तर गौतमी ९५.७६ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्दे गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग

नाशिक : गोदापात्रात दोन दिवसांपासून अडीच हजार क्युसेक पाण्याचा गंगापूर धरणातून विसर्ग केला जात होता; मात्र गुरूवारी (दि.८) सकाळी विसर्गामध्ये वाढ करण्यात आली. सकाळपासून गोदापात्रात ५हजार १०२ क्ुयसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा गोदावरीच्या पातळीत काही प्रमाणात वाढ होत आहे.गेल्या रविवारी गोदावरीमध्येगंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला महापूर आला होता. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली होती. सोमवारपासून पावासाचे प्रमाण धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तसेच शहरातही कमी झाल्याने विसर्गामध्ये घट केली गेली. ४५ हजारावरून थेट अडीच हजारापर्यंत विसर्ग कमी करण्यात आल्याने गोदावरीची पूरस्थिती नाहीशी झाली. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस जिल्ह्यातील घाट प्रदेशात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविल्याने गोदाकाठाला पुन्हा सतर्कतच्या सूचना दिल्या गेल्या. गुरूवारी मध्यरात्रीपासून गंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस होऊ लागल्याने गोदापात्रात सुरू असलेल्या विसर्गात अडीच हजार क्युसेकने विसग वाढविला गेला. त्यामुळे सध्या ५हजार १०२क्युसेकचा विसर्ग होत असून अहल्यादेवी होळकर पूलाखालून ७ हजार ८३० क्युसेक पाण्याचा विसर्ग पुढे रामकुंडात होऊ लागला आहे. त्यामुळे गोदापात्रातील पाण्याची पातळी दुतोंड्या मारूती मूर्तीच्या कमरेपर्यंत आली आहे.गुरू वारी सकाळपर्यंत गंगापूरमध्ये ८२, काश्यपीत ३२, गौतमीमध्ये ७६ तर त्र्यंबकमध्ये ९२ आणि अंबोलीत७९ मि.मी पावसाची नोंद झाली. यामुळे गंगापूरमध्ये नव्याने ३८६दलघफू पाणी पोहचले. त्यामुळे २ हजार ८०० वरून विसर्ग ५ हजार १००पर्यंत वाढविला गेला. गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला आहे. काश्यपी ९७.६२ तर गौतमी ९५.७६ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरgodavariगोदावरीgangapur damगंगापूर धरण