शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

५ लाख नाशिककर झाले विमेकरी

By admin | Updated: May 28, 2015 00:09 IST

प्रधानमंत्री विमा योजना : कालावधी जून २०१५ ते मे २०१६

नाशिक : देशातील ८० टक्केनागरिक विमा क्षेत्राच्या बाहेर असल्याने कष्टकरी लोकांनाही विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्राने सुरू केलेल्या विमा योजनांना नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ १७ दिवसांतच ही संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या त्या तीन प्रकारच्या योजना आहेत. सुरक्षा विमा आणि जीवनज्योती या दोन्ही योजना अनुक्रमे १२ आणि ३३० रुपयांच्या असून, त्यांना चांगला प्रतिसाद आहे. केवळ १२ रुपयांत अपघात विमा आणि ३३० रुपयांत नैसर्गिक मृत्यू आल्यास २ लाख रुपयांचा परतावा त्यातून मिळणार आहे. पेन्शन योजनेत सहभागी झाल्यानंतर आजचा युवक भविष्यात मुलांवर अवलंबून राहणार नाही. याशिवाय विमा योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या वारसांना या योजनेतून अपघातानंतर मदत दिली जाईल. ९ मे रोजी या योजनांचे उद्घाटन झाले तेव्हाच नाशिक जिल्ह्यात सुमारे एक लाख ६५ हजार लोकांनी यासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर दररोज या योजनेला प्रतिसाद मिळत असून, सर्व बॅँकांचे मिळून सुमारे ५ लाख नागरिकांनी विम्याचे कवच विकत घेतले आहे. हा विमा उतरवण्यासाठी खासगी बॅँकांनाही परवानगी देण्यात आल्याने बॅँकेने खातेधारकांना केवळ लघुसंदेशांच्या (एसएमएस) माध्यमातून ग्राहकांना आवाहन केले जात आहे. ज्या बॅँकेत खाते असेल त्याच बॅँकेत विमा उतरवण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास अनेक बॅँकांकडे विमा काढण्यासाठी खातेदारांनी धाव घेतली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र बॅँकेने ७० हजार विमे उतरवले आहेत.