शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिनेटसाठी जिल्ह्यात ४८ टक्के मतदान; २७ रोजी मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:55 IST

पुणे विद्यापीठ : ४ हजार ७२५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) नाशिक जिल्ह्यातील १७ केंद्रांतील २५ बुथवर मतदानाची प्रक्रि या सुरळित पार पडली असून, जिल्हाभरातून ४८.१५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८१३ मतदारांपैकी ४ हजार ७२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, या निवडणुकीची मतमोजणी २७ नोव्हेंबरला होणार आहे.

ठळक मुद्देसिनेटसाठी जिल्ह्यात ४८ टक्के मतदान; २७ रोजी मतमोजणी पुणे विद्यापीठ : ४ हजार ७२५ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी रविवारी (दि. १९) नाशिक जिल्ह्यातील १७ केंद्रांतील २५ बुथवर मतदानाची प्रक्रि या सुरळित पार पडली असून, जिल्हाभरातून ४८.१५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८१३ मतदारांपैकी ४ हजार ७२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, या निवडणुकीची मतमोजणी २७ नोव्हेंबरला होणार आहे.सिनेटसाठी नाशिकमध्ये एकूण ४०.१५ टक्के मतदान झाले असून, येवला तालुक्यात सर्वाधिक७३ टक्के मतदान झाले, तर सर्वांत कमी ३६ टक्के मतदान शहरातील एचपीटी महाविद्यालयातील केंद्रावर झाले. सिनेट निवडणुकीत यंदा तिरंगी लढत होत असून, नाशिक जिल्ह्यातून तिन्ही पॅनलमधील सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, २७ नोव्हेंबर रोजी विद्यापीठात मतमोजणी होणार आहे. पुणे विद्यापीठातर्फेनाशिकसह नगर व पुणे जिल्ह्यांत सिनेटच्या पदवीधर आणि व्यवस्थापन विभागासाठी शहरातील सहा केंद्रांवर तर जिल्ह्यातील ११ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रांवर सकाळी १० वाजेपासून मतदारांचा उत्साह दिसून अला. दुपारच्या सुमारास मतदारांचा ओघ काही प्रमाणात ओसरल्याचे पाहायला मिळाले असले तरी संध्याकाळी अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची आकडेवारी ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. शहरातील के. के. वाघ महाविद्यालय, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, भोसला महाविद्यालय, एचपीटी महाविद्यालय, सिडको महाविद्यालय आणि नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ५० हजार मतदारांनी नोंदणी केली होती. त्यातील नाशिकमध्ये ९ हजार ८१३ पैकी ४ हजार ७२५ मतदारांनी सहा मतदारांचे नशीब मतपेटीत बंद केले असून, या निवडणुकीचा कौल २७ नोव्हेबरला मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे. केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारीव्ही. एन. नाईक महाविद्यालय ४४ टक्के मतदान झाले असून, एचपीटी महाविद्यालयातील केंद्रावर ३६ टक्के मतदान झाले. सिडको महाविद्यालयात ४४ टक्के, के. के. वाघ महाविद्यालयात ४० टक्के, नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ३८.७, भोसला महाविद्यायात ४५, मनमाड येथील केंद्रात ६४, इगतपुरीत ६९, मालेगावी ४६, देवळ्यात ६७.२५ कळवणमध्ये ७०.१८, येवल्यात १३, सटाणा येथे ६४, दिंडोरीत ६८, सिन्नरमध्ये ६१, चांदवडला ४७, तर पिंपळगाव येथे ५५ टक्के मतदान झाले.