शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: July 10, 2016 00:47 IST

बाजार समित्या बंद : आज प्रधानसचिवांकडे तातडीची बैठक

नाशिक : बाजार समित्यांमधील फळभाज्या व शेतमालाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी ६ टक्के कर शेतकऱ्यांकडूनच घेण्याचा व या निर्णयाविरोधात पुकारलेल्या बंदमुळे येत्या ४८ तासात व्यापाऱ्यांनी त्यांची भूमिका न बदलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सहकार व बाजार समित्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रविवारी (दि.१०) राज्यातील सर्व विभागीय सह निबंधक व जिल्हा उपनिबंधकांची पणनच्या प्रधान सचिवांकडे तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.शनिवारी (दि.९) यासंदर्भात तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस विभागीय सह निबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कऱ्हे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती देवीदास पिंगळे, दिलीप बनकर, मुकुंद होळकर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, उषाताई शिंदे, संजय सांगळे, काशीनाथ मेंगाळ, अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्यासह शेतकरी उत्पादक गट (फामर्स प्रोड्युसर कंपनी)चे सदस्य आदि उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल विक्रीबाबत येणाऱ्या अडचणी, व्यापाऱ्यांचे आडमुठे धोरण, मुंबईसह अन्य ठिकाणी शेतमालाची वाहतूक यावर चर्चा झाली. व्यापाऱ्यांनी शासनाच्या बाजार समिती नियमन विरोधात पवित्रा घेतल्याने त्यांनी सोमवारपर्यंत त्यांचा पवित्रा न बदलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. सुरुवातीला व्यापाऱ्यांना विनंती करा, विनंतीला अव्हेरले, तर परवाने निलंबित करण्याची कारवाई करा आणि तरीही ऐकले नाही तर बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांना दिलेले गाळे खाली करा, अशी तंबी विभागीय सह निबंधक मिलिंद भालेराव यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या बाजार समित्यांच्या सभापतींना दिल्याचे कळते. त्यामुळे सोमवारी व्यापारी सहभागी न झाल्यास त्यांचे परवाने निलंबित होण्याची कारवाई सहकार विभागाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. काही बाजार समित्यांच्या सभापतींनी शेतकऱ्यांचा शेतमाल थेट बाजार समितीने विकत घेऊन तो व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी बाजार समित्यांना खेळते भांडवल पुरविण्याची मागणी केली, तर काही सभापतींनी बाजार समितीच्या आत आणि बाहेर वेगवेगळे कायदे नको, सर्वांना सारखा कायदा हवा,अशी मागणी केली. शेतकऱ्यांना कोणीही वेठीस धरणार नाही, याची काळजी घ्या, असे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सूचित केले. तसेच शेतकऱ्यांसाठी १०७७ हा टोल फ्री नंबरही सुरू करण्यात आल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)