शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीच्या मोबदल्यात दरमहा ४६ कोटी

By admin | Updated: August 3, 2015 23:26 IST

शासन अनुदान : जकातीचे खासगीकरण ठरले तारक

नाशिक : राज्य शासनाने एलबीटी रद्द करतानाच महापालिकेला गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च आधारभूत उत्पन्नावर ८ टक्के वाढ गृहीत धरून अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार नाशिक महापालिकेला जकात खासगीकरणाच्या वेळी सन २०१२-१३ या वर्षात मिळालेल्या उत्पन्नावर आधारित दरमहा सुमारे ४६ कोटी रुपये प्राप्त होण्याची शक्यता आहे. जकात खासगीकरणाचा राबविलेला प्रयोगच आता महापालिकेला तारक ठरला असून, शासनाकडून आॅगस्ट ते डिसेंबर २०१५ या कालावधीसाठी महापालिकेला २२९ कोटी २४ लाख रुपये पदरात पडणार असल्याचे समजते. राज्य शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटींच्या आत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांसाठी एलबीटी रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. त्यानुसार ३२ हजार व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले असून, ५० कोटींच्या वर उलाढाल असलेल्या ९२ व्यावसायिकांच्या माध्यमातून महापालिकेला सुमारे २०० ते २२५ कोटी रुपये मिळणार आहेत. एलबीटीच्या मोबदल्यात राज्य शासनाकडून महापालिकेला अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या मागील पाच वर्षांतील सर्वोच्च आधारभूत उत्पन्नावर ८ टक्के वाढ गृहीत धरून अनुदान वितरित केले जाणार आहे. या अनुदानाकरिता राज्यातील २५ महापालिकांकरिता शासनाने तातडीची उपाययोजना म्हणून सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांसाठी २०४८.४४ कोटी रुपयांची तरतूद पूरक मागणीद्वारे केलेली आहे. नाशिक महापालिकेला गेल्या पाच वर्षांत सन २०१२-१३ या वर्षात सर्वाधिक ६९५ कोटी ५१ लाख रुपये उत्पन्न जकातीच्या माध्यमातून प्राप्त झाले होते. या वर्षी महापालिकेने जकातीचे खासगीकरण करत ठेका दिला होता. खासगीकरणामुळे महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे २०० कोटींनी वाढ झालेली होती. आता हेच खासगीकरणातून मिळालेले उत्पन्न महापालिकेसाठी तारक ठरले असून, त्यावरच महापालिकेला शासनाकडून ८ टक्के वाढ गृहीत धरून सुमारे ४६ कोटी रुपये दरमहा अनुदान दिले जाणार आहे. नागरी भागातून प्राप्त होणाऱ्या मुद्रांक शुल्कापासून मिळणारे उत्पन्न महापालिकेकडे वळते करण्यात येणार आहे. महापालिकेला या अनुदानाव्यतिरिक्त ५० कोटींच्या वर उलाढाल असलेल्या व्यावसायिकांकडून दरमहा सुमारे १५ कोटी रुपये प्राप्त होणार आहे. त्यामुळे दोन्ही मिळून महापालिकेच्या खजिन्यात दरमहा सुमारे ६० कोटी रुपये पडणार आहेत. दरवर्षी उत्पन्नात २० टक्के वाढ गृहीत धरता सदर निश्चित केलेल्या उत्पन्नामुळे महापालिकेची ओढाताण होणार असून, आर्थिक चिंता वाढणार आहेत.