शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

४६ लाख रुपये कंपनीला मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:14 IST

नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेच्या कामगिरीमुळे आॅनलाइन फसवणूक झालेल्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील कंपनीची ४६ लाखांची रक्कम कंपनीला परत मिळाली आहे़ याबाबत कंपनीने ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व सायबर शाखेचे आभार मानले आहेत़दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील हायटेक ई़डी़एम़ या कंपनीने चीनमधील सुझोऊ लिस्ट्राँग मेकॅनिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल कंपनीकडून ०४ ...

ठळक मुद्देआॅनलाइन फसवणूक : जानोरी येथील कंपनी; सायबर पोलिसांची कामगिरी

नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेच्या कामगिरीमुळे आॅनलाइन फसवणूक झालेल्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील कंपनीची ४६ लाखांची रक्कम कंपनीला परत मिळाली आहे़ याबाबत कंपनीने ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व सायबर शाखेचे आभार मानले आहेत़दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील हायटेक ई़डी़एम़ या कंपनीने चीनमधील सुझोऊ लिस्ट्राँग मेकॅनिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल कंपनीकडून ०४ ईडीएम वायर मशीन खरेदीसाठी आॅनलाइन पद्धतीने एस बँकेद्वारे पैसे देण्यात येणार होते़ या व्यवहारासाठी चीनमधील कंपनीने बँक अकाउंट नंबरही ई-मेलद्वारे कळविला होता़ यानंतर २७ जून २०१८ रोजी अज्ञात इसमांनी चीनमधील कंपनीची बनावट ई-मेल आयडी तयार करून त्याद्वारे दुसरे अकाउंट नंबर देऊन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले़ त्यानुसार जानोरीतील कंपनीच्या संचालकांनी बँक खात्यावर ४६ लाख ७७ हजार ३६ रुपये आॅनलाइन पद्धतीने ट्रान्सफर केले होते़चीनमधील कंपनीस पैसे देऊनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने शंका आल्याने त्यांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे संचालकांच्या लक्षात आले़ याबाबत ४ जुलै २०१८ रोजी नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी या आॅनलाइन फसवणुकीची सविस्तर माहिती घेतली़ यानंतर यस बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून आॅनलाइन पेमेंट थांबविण्याची विनंती केली़ त्यानुसार बँकेने ६ जुलै २०१८ रोजी हा व्यवहार रद्द करून आॅनलाइन ट्रान्सफर केलेली रक्कम पुन्हा जानोरी येथील कंपनीच्या खात्यात वर्ग केली़सायबर पोलिसांनी जलदगतीने तांत्रिक तपास केल्यामुळेच कंपनीची फसवणूक टळली आहे़ याबाबत कंपनीचे संचालक श्रीकांत शिंदे व पदाधिकाºयांनी पोलीस अधीक्षक व सायबर पोलिसांचे आभार मानले आहे़अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक करपे, सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक तुषार आढाव, महिला पोलीस नाईक सोनाली पाटील, आरती पारधी, पोलीस हवालदार परीक्षित निकम, प्रमोद जाधव, प्राजक्ता सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.आॅनलाइन फसवणुकीत पैसे कंपनीस परत मिळवून दिल्याने अधीक्षक दराडे यांचा सत्कार करताना हायटेक ई़डी़एम़ या कंपनीचे संचालक श्रीकांत शिंदे व सहकारी. कोणतीही बँक अथवा बँकेचे प्रतिनिधी फोन, ई-मेल व वैयक्तिकरीत्या खातेदारास बॅँक अकाउंट व पासवर्डबाबत विचारणा करीत नाहीत़ नागरिकांनी आपले बँक खाते, पासवर्ड वा ओटीपी याबाबतची माहिती देऊ नये़ आॅनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा.- संजय दराडे,ग्रामीण पोलीस अधीक्षक