नाशिक- जिल्'ात उन्हाच्या कडाक्यामुळे पाणीटंचाईदेखील वाढीस लागली आहे. सध्या ७० गावे आणि १२२ वाड्यांना ४५ टॅँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, नाशिक शहरातच तपमान ४० अंशापर्यंत गेले होते, तर मालेगावमध्ये त्यापेक्षा अधिक पारा गेला होता. उन्हामुळे पाणीटंचाई जाणविण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ४५ टॅँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू असून, त्यात सिन्नर तालुक्यात १२, येवला तालुक्यात ८, नांदगाव आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी सहा, देवळ्यात पाच, बागलाण तीन, चांदवड दोन तसेच अन्य भागांत टॅँकर सुरू आहेत.
जिल्'ात ४५ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू
By admin | Updated: April 30, 2015 01:55 IST