शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

प्रत्येक प्रभागाला ४५ सफाई कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 14:46 IST

नाशिक : महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्या सोयीच्या नियुक्त्या आणि प्रभागांमध्ये सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप याबाबत सभागृहात सदस्यांकडून वारंवार होणारी ओरड लक्षात घेता महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने सफाई कर्मचाºयांचे समान वाटपाचे सूत्र तयार केले असून ३१ प्रभागांना प्रत्येकी ४५ सफाई कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. आठवडाभरात त्याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापौर ...

नाशिक : महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्या सोयीच्या नियुक्त्या आणि प्रभागांमध्ये सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप याबाबत सभागृहात सदस्यांकडून वारंवार होणारी ओरड लक्षात घेता महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने सफाई कर्मचाºयांचे समान वाटपाचे सूत्र तयार केले असून ३१ प्रभागांना प्रत्येकी ४५ सफाई कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. आठवडाभरात त्याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मागील महिन्यात झालेल्या महासभेत हेमलता कांडेकर यांनी शहरातील सफाई कर्मचाºयांसंबंधी माहिती विचारलेली होती. त्यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत सफाई कर्मचाºयांच्या असमतोल नियोजनाचे वास्तव समोर आले होते. महापालिकेत सफाई कर्मचाºयांची संख्या १९९३ असली तरी त्यातील २६२ कर्मचारी हे प्रशासनाच्या कामाच्या सोयीने प्रत्यक्ष रस्त्यावर काम न करता विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक १८८ कर्मचारी कार्यरत आहेत तर सर्वात कमी अवघे ६ कर्मचारी प्रभाग २८ मध्ये कार्यरत आहेत. जुन्या नाशिकमधीलच प्रभाग क्रमांक १४ मध्ये १४३ कर्मचारी नियुक्त आहेत. दोन्ही प्रभागात दाट लोकवस्ती असली तरी कर्मचाºयांची संख्या ३३१ इतकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संख्या असली तरी जुने नाशिक परिसरात स्वच्छतेबाबतची ओरड काही थांबलेली नाही. अनेक प्रभागांमध्ये २० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय, अनेक कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर नसल्याचे अधिकाºयांनी दिलेल्या भेटीत निदर्शनास आले होते. त्यामुळे नवीन प्रभाग झाल्याने सफाई कर्मचाºयांचे प्रभागनिहाय समान वाटप करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. महापौरांनीही त्याबाबतचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. त्यानुसार, प्रत्येक प्रभागाला ४५ सफाई कामगार उपलब्ध होणार असून अन्य विभागात कामाच्या सोईने नियुक्त झालेल्या २६२ कर्मचाºयांच्या हाती झाडू सोपविण्यात येणार आहे.