शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा

By admin | Updated: March 5, 2017 02:01 IST

नाशिक : जिल्ह्यात पाण्याची मागणी व धरणामधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागताच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, पाण्याची मागणी व धरणामधील उपलब्ध साठा पाहता आगामी चार महिन्यांत पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के साठा असून, त्यात सिंचनाचे आवर्तनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात सात वर्षांनंतर गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणांमध्येही आॅक्टोबर अखेर ९२ टक्के इतका साठा शिल्लक होता. याशिवाय समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले, तसेच गावोगावी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील पाझरतलाव, सीमेंट बंधारे, शेततळ्यांमध्येही कमालीचे पाणी साठले. या साठलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांनी खरीप व रब्बीचे पिके पिकविली. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी शक्यता व्यक्ती केली जात असताना, प्रत्यक्षात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटू लागले, विहिरींनीही तळ गाठल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. विशेष करून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्णातील मोठे, मध्यम धरणांमध्ये ४४ टक्के इतकेच पाणी शिल्लक असून, या पाण्यावर आगामी चार महिन्यांची गरज भागवावी लागणार आहे. त्यातही नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ५८ टक्के इतके पाणी शिल्लक आहे. याशिवाय पालखेड धरण समूहात १७ तर गिरणा खोऱ्यात ४४ टक्के साठा आहे. या शिल्लक पाणी साठ्यात जिल्ह्णातील पाणीपुरवठा योजना, नळ पाणी योजना तसेच सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या धरणातून त्यासाठी पाणी सोडण्यात येणार असून, याशिवाय लगतच्या जिल्ह्णांचे असलेले आरक्षण वेगळे आहे.