नाशिक : व्यवस्थापकपदाचा गैरवापर करून बँकेतील खातेदारांच्या खात्यावरील ४४ लाख रुपयांची रक्कम स्वत:च्या तसेच नातेवाइकांच्या खात्यावर परस्पर वर्ग करून अपहार केल्याचा प्रकार बँक आॅफ इंडियाच्या इंद्रकुंड (पंचवटी) शाखेत घडला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बँक व्यवस्थापक अंकुर सत्यपाल छाबरा (रा़ बिल्डिंग नंबर ३/३०२, सीतादल, इन क्लाइव्ह, बिटी कवाडे रोड, पुणे) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बँक आॅफ इंडियाची शाखा आहे़ २७ जुलै २०१५ ते २१ एप्रिल २०१६ या कालावधीत अंकुर छाबरा हे व्यवस्थापक (मॅनेजर) होते़ या कालावधीत त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत शाखेतील बँक ग्राहकांच्या खात्यातील ४३ लाख ८२ हजार रुपयांची रोकड परस्पर स्वत:च्या तसेच नातेवाइकांच्या बँक खात्यात परस्पर वर्ग करून बँक व खातेदारांची फसवणूक केली़ बँकेच्या लेखापरीक्षणात हा प्रकार समोर आल्याने बँक व्यवस्थापक रमेश अमृतकार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन व्यवस्थापक छाबरा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बॅँक व्यवस्थापकाकडून ४४ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:19 IST