शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

४१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

By admin | Updated: May 30, 2017 00:11 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८च्या मूळ ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२ च्या अर्थसंकल्पास काही कपातींच्या दुरुस्तींसह मंजुरी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८च्या मूळ ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२ च्या अर्थसंकल्पास सोमवारी (दि.२९) झालेल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत काही कपातींच्या दुरुस्तींसह मंजुरी देण्यात आली.दरम्यान, कपात करण्यात आलेल्या विभागांमध्ये प्रामुख्याने बांधकाम, लघुपाटबंधारे व कृषी विभागातील योजनांचा समावेश आहे. मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी असलेली पाच लाखांची तरतूद वाढवून २० लाख करण्यात आली, तर ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी असलेली चारचाकी वाहन खरेदी योजना याही वर्षी धरण्यात येऊन त्यात एक कोटींनी वाढ करून या योजनेसाठी दोन कोटींचा निधी ठेवण्यात आला. पदाधिकारी व अधिकारी निवासस्थान व कार्यालय दुरुस्तीवरील धरण्यात आलेल्या एकूण तरतुदीत एक ते दीड कोटींनी कपात करण्यात येऊन हा निधी रस्ते व बंधारे दुरुस्तीसाठी तीन लाखांनी वाढविण्यात आला.अध्यक्षस्थानी शीतल उदय सांगळे होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, सभापती अर्पणा खोसकर, मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, यतिन पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वीज वितरणाचा आढावा घेण्यात आला. कंपनीकडील असलेल्या तक्रारींचा ओघ पाहून स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात मुद्रांक, वाहन व व्यवसाय करापोटी एकूण २७ कोटी ६१ लाख जमा होणार असल्याचे स्पष्ट केले. एकूण जमेच्या बाजू धरून ४१ कोटी ८ लाख २९ हजार ९९२चा अर्थसंकल्प सादर केला. खर्चाच्या बाजू मांडताना डॉ. कुंभार्डे, धनराज महाले, बाळासाहेब क्षीरसागर, यतिन पगार, नितीन पवार, उदय जाधव, भास्कर गावित, हिरामण खोसकर यांनी अधिकारी निवासस्थान तसेच कार्यालय दुरुस्तीसाठीच्या एक कोटी ३० लाखांपैकी ६५ लाखांच्या खर्चात कपात करून निधी सेसकडे वळविला.

जाधव-गावित खडाजंगीच्कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमधून राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांनी कपाती सूचविल्यानंतर उपाध्यक्ष नयना गावित व उदय जाधव यांच्यात खडाजंगी झाली. या योजनांसाठी राज्यस्तरावरून निधी येत असल्याने त्यासाठीची तरतूद रद्द करावे, असे जाधव यांचे म्हणणे होते, तर योजनांमध्ये तुम्ही कपात सुचवून शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे उपाध्यक्ष नयना गावित यांचे म्हणणे होते.