शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक केंद्रावरून ४ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST

नाशिक : लोकसेवा आयोगाचे केंद्र नाशिकला मंजूर झाल्यानंतर येत्या १० ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये प्रथमच परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या ...

नाशिक : लोकसेवा आयोगाचे केंद्र नाशिकला मंजूर झाल्यानंतर येत्या १० ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये प्रथमच परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या निमित्ताने आयोगाचे उपसचिव एस.के. गुप्ता यांनी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. आयोगाच्या मानांकनानुसार जिल्हा प्रशासनाने परीक्षेची तयारी केली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील आढावा बैठकीचे तसेच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सिव्हिल सर्विस पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासंदर्भातील प्रशिक्षणासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून गुप्ता यांच्यासोबत अवर सचिव दीपक पंत,उज्ज्वल कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी परीक्षा केंद्राचे प्राध्यापक हजर होते.

ऑक्टोबर २०२१ मध्ये होऊ घातलेल्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये एकूण १२ केंद्रे निश्चित आली असून, साधारण ४ हजार ४०० इतक्या परीक्षार्थ्यांनी नाशिक केंद्र म्हणून पर्याय निवडलेला आहे. विशेष बाब म्हणजे परीक्षेसाठी दिव्यांग परीक्षार्थींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबद्दलचे निर्देश गुप्ता यांनी यावेळी दिले आहेत. आयोगाकडून दर्शविण्यात आलेल्या अपेक्षांबद्दल जिल्हाधिकारी मांढरे यांनी यंत्रणा सज्ज असल्याबद्दलची ग्वाही दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी यावेळी आभार मानले.

--इन्फो--

`१) जिल्ह्यातून १२ परीक्षा केंद्रांची निवड

२) ४ हजार ४०० विद्यार्थी देणार परीक्षा

३) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असेल स्वतंत्र व्यवस्था