शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी चारशे शेतकºयांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:14 IST

४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यात नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे ५० शेतकºयांकडून ४० हेक्टर जागेची थेट खरेदी करण्यात आली असून, त्यापोटी ४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.

४० कोटींचे वाटप : ४० हेक्टर जमीन ताब्यातनाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या घोषणेपासूनच विरोधी भूमिका घेणाºया जिल्ह्यतील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांचे मन वळविण्यास प्रशासनाला यश आल्याने जवळपास चारशे शेतकºयांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे ५० शेतकºयांकडून ४० हेक्टर जागेची थेट खरेदी करण्यात आली असून, त्यापोटी ४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून समृद्धी महामार्ग जाणार असून, या मार्गासाठी लागणाºया जमिनींची संयुक्त मोजणी प्रशासनाने पूर्ण केली आहे. तथापि, या मार्गाची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक गावागावातून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यात आला होता. मोर्चे, आंदोलने, घेराव यांसारख्या आंदोलनांनी शेतकºयांमध्ये जागृती करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील शिवडेसह ज्या सहा गावांनी मोजणीस विरोध करून आंदोलनाचे अस्त्र उपसून मोजणी करण्यात आलेल्या अधिकाºयांना पिटाळून लावल्यामुळे तर महामार्गाच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली जात होती.या जागांचे मूल्यमापनही पूर्ण करण्यात आल्यामुळे आता फक्त शेतकºयांच्या सहमतीवरच सारी भिस्त आहे. त्यातील सुमारे ५० ते ५५ शेतकºयांकडून ४० हेक्टर क्षेत्राची खरेदी घेण्यात आली असून, सिन्नर तालुक्यातील तीनशे व इगतपुरीतील शंभर अशा चारशे शेतकºयांनी आजच समृद्धीसाठी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात या जमिनींची खरेदी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिस्से, पोटहिश्शांची अडचणसमृद्धीसाठी जागा खरेदीत प्रामुख्याने शेतकºयांचे हिस्से, पोटहिश्शांची मोठी अडचण आहे. एकाच क्षेत्रावर तीन ते चार जागा मालकांचे हिस्से आहेत. अशावेळी सर्वांची एकत्रित संमती मिळण्यात तसेच प्रत्येकाच्या क्षेत्राचे वर्गीकरण करून त्याचे मूल्यांकन करणे अवघड व वेळखाऊपणाचे असल्याने थेट खरेदीत अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.