शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावात ४००ची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:20 IST

कांदा भावातील तेजी पाहता मुंबई व पुणे येथील काही मोठ्या कांदा व्यापाºयांनी नफा मिळविण्याच्या हेतूने थेट इजिप्तमधून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात केल्यामुळे शुक्रवारी येथील बाजारपेठेत ४०० रुपयांनी भाव घसरले. सरासरी भाव २१०० रुपये भाव होते. सकाळी २४११ कमाल ते सरासरी २१०० रुपये भाव होते.

लासलगाव : कांदा भावातील तेजी पाहता मुंबई व पुणे येथील काही मोठ्या कांदा व्यापाºयांनी नफा मिळविण्याच्या हेतूने थेट इजिप्तमधून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात केल्यामुळे शुक्रवारी येथील बाजारपेठेत ४०० रुपयांनी भाव घसरले. सरासरी भाव २१०० रुपये भाव होते. सकाळी २४११ कमाल ते सरासरी २१०० रुपये भाव होते.गुरुवारी येथील मुख्य बाजार समितीत ११०० वाहने कांद्याची आवक झाली. कांद्याला कमीत कमी ७०० प्रतिक्विंटल, तर सरासरी २३५०, तर जास्तीत जास्त २६५० रु पये भाव होते.येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांदा आवक टिकून, बाजारभावात घसरण झाल्याचे चित्र आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसात दिसले.कांदा सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर काही व्यापाºयांनी इजिप्तचा कांदा आयात केल्याच्या बातम्या आल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर इ. ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ४६७०० क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. ७०० ते २३५१, तर सरासरी २२५० प्रतिक्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ३९०८५ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे भाव किमान ७०० ते २४५३, तर सरासरी २२५० पर्यंत होते.