शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जूनच्या मध्यावर नाशिकमधील धरणांमध्ये ४० टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:37 IST

नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे.

नाशिक : मागील वर्षापासून वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने तृप्त झालेल्या धरणांमध्ये यंदादेखील समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २४ प्रकल्पांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा असून, काही धरणांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे.यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनचा प्रभाव नाशिक जिल्ह्यातही पहायला मिळाला. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहे, तर तत्पूर्वी निसर्गचक्रीवादळामुळेदेखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. खरिपाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा मान्सून अनुकूल असल्याने पुढील आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना करावा लागल्याने जिल्ह्याची परिस्थिती बिकट होती. जिल्ह्यातील सहा तालुके शासनाने दुष्काळी म्हणून जाहीरही केले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने साहजिकच धरणांमधील साठाही मर्यादित होता. यावरून राजकीय वातावरणही तापले होते.मागीलवर्षी मात्र वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने नाशिकमधील धरणे १०० टक्के भरलीच शिवाय मराठवाडाचादेखील पाणीप्रश्न सुटला.मागीलवर्षीच्या पाणी साठ्यामुळे यंदा जूनच्या मध्यावरच धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असून, पाच धरणे ४० टक्क्यांच्या पुढे तर उर्वरित धरणांमध्ये ३० ते ३५ टक्के इतका पाणीसाठा आहे.-------------------मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर धरणांची पातळी लवकर वाढण्याची शक्यता आहे. सध्या गंगापूर, ओझरखेड, दारणा, नांदुरमधमेश्वर, हरणबारी आणि पूनद या प्रकल्पांमध्ये ४० टक्केच्या पुढे पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत धरणांमधील पाणीसाठा आणि एकूणच अनुकूल पावसाचा परिणाम लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थितींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने नियोजनदेखील केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक