शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

जिल्हा परिषदांमध्ये ४० टक्के पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:38 IST

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचाºयांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी लागते. सदस्य त्यांच्याकडून प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षादेखील करतात. परंतु राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये जवळपास ४० टक्के पदे रिक्त असल्याने कर्मचाºयांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे.

ठळक मुद्देकामाचा ताण : कर्मचारी युनियन आंदोलनाच्या तयारीत कर्मचाºयांची कपात केली तर मोठे आंदोलन

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचाºयांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी लागते. सदस्य त्यांच्याकडून प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षादेखील करतात. परंतु राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये जवळपास ४० टक्के पदे रिक्त असल्याने कर्मचाºयांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. त्यातच शासन अजूनही कर्मचारी कपातीच्या मानसिकतेत आहे. कर्मचाºयांची कपात केली तर मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या केंद्रीय परिषदेत देण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष बलराज मगर हे होते.महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची केंद्रीय कार्यकारिणी सभा नुकतीच अलिबाग येथे संपन्न झाली. यावेळी सभेत जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांवरील कामाच्या तणाबाबत गंभीरतेने चर्चा करण्यात आली. अलिबाग शाखेने या अधिवेशनाचे यजमानपद भुषविले होते. यावेळी झालेल्या चर्चेत कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, कर्मचारी कपात धोरण तत्काळ थांबवावे, वेतन त्रुटी दूर करणे, पदोन्नतीचा कोटा वाढविणे, कंत्राटी कर्मचाºयांना नियमित करणे, वेतनत्रुटी दूर करणे आदी मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात शासनाचा वेळकाढूपणा सुरू असून, याबाबत सघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. सातव्या वेतन आयोगासाठी शासनाने फक्त बक्षी समिती नियुक्त केलेली आहे, मात्र या समितीने कामकाजाला सुरुवातच केली नसल्याने वेतन आयोगाबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. किंबहूना या निर्णयाला विलंब होण्याची शक्यता आहे. शासनानेदेखील वेतन आयोगासाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेली नाही. याविषयी शासनाविरोधात कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोेष असल्याचा सूर अधिवेशनात उमटला.आजमितीस जिल्हा परिषदांमध्ये जवळपास ४० टक्के पदेरिक्त असून, शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणीचे काम या कर्मचाºयांना करावी लागते. मात्र कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने कामावर अनेक मर्यादा येतात. कर्मचाºयांवर कामाचा ताणही पडतो. त्यामुळे योजना अंमलबजावणीत अनेकदा अडचणी येतात. शून्य पेंडीसीसाठी कर्मचाºयांकडून अपेक्षा केली जाते. परंतु त्या तुलनेत कर्मचारी उपलब्ध नाहीत. सदर बाब कर्मचारी विरोधात असल्याचे मगर यांनी भाषणातून सांगितले. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष बाबूराव पूजरवाड, सरचिटणीस विवेक लिंगराज व राज्यभरातील २९ जिल्ह्णांचे अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकमधून संघटनेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे, उपाध्यक्ष अजय कस्तुरे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश थेटे, कोषाध्यक्ष प्रशांत कवडे, रवींद्र गायकवाड उपस्थित होते.आंदोलनाचा इशाराकर्मचाºयांवरील कामाचा ताण आणि कर्मचारी कपातीची भूमिका यामुळे सर्व जिल्हा परिषद संवर्गाला बरोबर घेऊन शासनाच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या विविध मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, कर्मचारी कपात धोरण तत्काळ थांबवावे अन्यथा आंदोलन अटळ असल्याचे युनियने म्हटले आहे.